आमदारांची यादी राज्यपालांना मंजूर करावी लागेल : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat

सातारा : विधानपरिषद आमदारांच्या निवडीचे सर्वाधिकार राज्यघटनेने मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. यामुळे मंत्रीमंडळाने दिलेली विधानपरिषदेच्या आमदारांची यादी राज्यपालांना मंजूर करावी लागेल, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी साताऱ्यात स्पष्ट केले.

ना. थोरात म्हणाले, महाविकास आघाडीचे हे सरकार पाच वर्षे टिकेल. अर्णव गोस्वामीचा विषय हा काही लोकशाहीवरील विषय नाही. भाजपने त्यांच्या काळात हे प्रकरण दाबले. भाजपमधील आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते चलबिचल आहेत.

विविध गोष्टी करून ते पदाधिकाऱ्यांचे मनोधैर्य टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागणार असे वाटत होते. मात्र आपण सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र आली आणि सरकार बनले. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. जातीयवादी पक्षांना आपण दूर ठेवले. आपला पक्ष विचार मानतो आणि तो राज्यघटनेशी निगडित आहे.

आपण किमान समान कार्यक्रम केला. सरकार आले. आम्ही शपथ घेतली. मंत्रिमंडळ, खातेवाटप झाले. आपण कर्जमाफी केली. संकटात आम्ही काम करत होतो. आपल्याला आंदोलने जोरात करावी लागतील. लोकांचे प्रश्न घेऊन उतरावे लागेल. काका बाबांना जनतेने एकत्र आणले आहे. आपल्याकडे नवीन कार्यकर्ते येत आहेत. आपलाच विचार देशाला तारणार आहे. काहीजण तर स्वप्नात शपथ घेत होते. मात्र, त्यांची निराशा झाली. जनतेच्या अंत:करणात काँग्रेसचा विचार आहे. कार्यकर्त्यांनी आता कंटाळा करता कामा नये. त्याला मदत करावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER