या महागड्या बार आणि रेस्टॉरंट्सचे मालक आहेत बॉलिवूड स्टार्स; आशा भोसले यांचाही या यादीत समावेश

Kangana Ranaut - Asha Bhosle

बॉलिवूडची बोल्ड आणि बोलकी अभिनेत्री कंगना राणावत या दिवसांत मनालीमध्ये तिचे नवीन रेस्टॉरंट उघडण्याविषयी बरीच चर्चेत आहे. तिने स्वत: ही माहिती तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे. पण काहीच लोकांना माहिती आहे की कंगनाच्या आधीही बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी या धंद्यात नशीब आजमावले आणि यशस्वीही झाले. चला जाणून घेऊया ते स्टार्स कोण आहेत, ज्यांनी रेस्टॉरंट्स सुरू केले आणि त्यांच्या नावांनी परिचित आहेत…

शिल्पा शेट्टी
अभिनेत्री शिल्पा शेट्टी चित्रपटांव्यतिरिक्त रेस्टॉरंट्स, स्पा आणि बारचा व्यवसाय करते. शिल्पाने काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वरळी (Worli) भागात ‘बेस्टियन चेन’ नावाचे एक नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर शिल्पा या हॉस्पिटॅलिटी व्यवसायातून कोट्यवधींची कमाईही करते.

जैकलिन फर्नांडिस
जैकलिन फर्नांडिसने कोलंबो श्रीलंकेत स्वत:चे रेस्टॉरंट सुरू केले आहे. ‘काएमासूत्र’ असे या रेस्टॉरंटचे नाव आहे. सुरुवातीला सेलिब्रिटी शेफ दर्शन मुनिराम हे येथील मुख्य शेफ होते. इथल्या पर्यटकांना श्रीलंकेचे सर्व आवडते पदार्थ मिळतात.

बॉबी देओल
आश्रम फेम अभिनेता बॉबी देओल एक किंवा दोन नव्हे तर तीन रेस्टॉरंट्सचा मालक आहे. बॉबी देओलचे हॉटेल ‘समप्लेस ऐल्स’ मुंबईच्या अंधेरीमध्ये आहे. हे ठिकाण इतके सुंदर आहे की आपण येथे आपल्या कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवू शकता. हे हॉटेल भारतीय आणि चिनी पदार्थांसाठी खूप प्रसिद्ध आहे. हे हॉटेल बॉबीने अतिशय सुंदरपणे बनवले आहे.

सुष्मिता सेन
आर्या या वेब सीरिजमधून उत्तम पुनरागमन करणारी सुष्मिता सेनचीही तिच्या व्यवसायात चांगली पकड आहे. सुष्मिताचे मुंबईतही एक रेस्टॉरंट आहे जे बंगाली पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. ज्याचे ‘बंगाली माशी किचन’ असे नाव आहे. या अभिनेत्रीचा दागिन्यांचा व्यवसायही तिची आई सांभाळते. याशिवाय सुष्मिताचे तंत्र एंटरटेनमेंट नावाचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊसदेखील आहे.

आशा भोसले
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जेवणाची आवड आहे. आशा भोसले ह्यादेखील गाण्याव्यतिरिक्त रेस्टॉरंटच्या व्यवसायात माहीर आहेत. भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये त्यांचे रेस्टॉरंट्स आहेत. त्यांनी परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी किंवा ज्यांना भारतीय पाककृती आवडते त्यांच्यासाठी रेस्टॉरंट चेन सुरू केली आहे. त्यांनी दुबई, कुवैत, यूके आणि बर्मिंघममध्ये स्वतःची रेस्टॉरंट्स सुरू केली आहेत. विशेष म्हणजे या सर्व रेस्टॉरंट्सचे नावे ‘आशा’ आहे.

सुनील शेट्टी
बॉलिवूड अभिनेता अण्णा सुनील शेट्टी मुंबईत बनवलेल्या ‘मिशिफ रेस्टॉरंट’ आणि ‘बार H20’ चा मालक आहे. याव्यतिरिक्त, त्याचे भारतात अनेक जिम चालू आहेत आणि पॉपकॉर्न एंटरटेनमेंट नावाचे प्रॉडक्शन हाऊसदेखील आहे ज्यामध्ये ‘खेल’, ‘रक्त’, ‘भागमभाग’, ‘मिशन इस्तंबूल’ आणि ‘ईएमआय’ असे चित्रपट तयार झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER