‘ते’ पत्र माझ्याच मेल आयडीवरून पाठवले, परमबीर सिंग यांचा खुलासा

Parambir Singh

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझेला (Sachin Vaze) १०० कोटी रुपयांचे ‘टार्गेट’ दिले होते, असा आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्याना पाठवून माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, सरकारमधील काहींनी या पत्रावर सही नाही. ते परमबीर सिंग यांच्याच मेल आयडीवरून पाठवले आहे काय, अशी शंका व्यक्त केली होती. पण, त्यांची शंका निराधार ठरली. स्वतः परमबीर सिंग यांनी खुलासा केला, ते पत्र माझ्याच मेल आयडीवरून (Mail ID) पाठवले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना परमबीर सिंग यांनी हा खुलासा केला. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणात एनआयएने अटक केलेले एपीआय सचिन वाझे यांना गृहमंत्र्यांनी दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याचं ‘टार्गेट’ दिले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या पत्रावर शंका उपस्थित केली जात होती, मात्र आता स्वतः परमबीरसिंग यांनी हे पत्र खरं असल्याचं सांगितल्यानं गृहमंत्र्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीरसिंग यांचे आरोप फेटाळून लावले आहेत, तसेच या प्रकरणाची चौकशी करण्या

ही बातमी पण वाचा : परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर ठाकरे सरकार अडचणीत; संजय राऊतांचे संकेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER