देशाचा राजकारण हाकणारा नेता, राजकारणातला देवमाणूस गेला; राजीव सातवांना वडेट्टीवारांकडून शब्दांची आदरांजली

Maharashtra Today

मुंबई : काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचं निधन झाले. मात्र, राजीव सातव(Rajiv Satav) यांची कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरली.

फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनावरील उपचारादरम्यान पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘राजकारणातला देवमाणूस गेला.’ अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Vadettiwar) यांनी सातव यांना आदरांजली वाहिली.

“त्यांच्या निधानाने काँग्रेस पक्षाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. राजकारणातला देवमाणूस गेला. राजीव सातव तरुण तडफदार होते. अभ्यासू नेते होते. कोणत्याही विषयांवर बोलू शकतील, असे ज्ञान त्यांच्याकडे ज्ञान होते. जिद्दीने आणि चिकाटीने काम करणे त्यांच्या रक्तात होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी आपली छाप दिल्लीत सोडली होती. व्यक्ती म्हणून ते हळवे होते. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना ते समजून घेऊन त्यांच्यावर योग्य मार्ग काढत. आम्हाला नेहमी राजीव यांचे मार्गदर्शन लाभत होते. दिल्लीत गेल्यानंतर एक हक्काचा माणूस की ज्यांच्याकडे जाऊन त्यांना आपल्या भावना सांगाव्यात आणि त्यांनी ते प्रश्न सोडवावेत, असा नेता आम्ही गमावला.” अशी शब्दांची आदरांजली विजय वडेट्टीवार यांनी दिले.

“माझ्यापेक्षा वयाने छोट्या असणाऱ्या राजीवजींनी मला समजावले. माझ्या समस्येवर मार्ग काढला. माझी खंत जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासंबंधी आश्वस्त केले. आज राजकारणातला देवमाणूस गेला.” अशा भावना वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या.

“दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हिंगोलीसारख्या छोट्या जिल्ह्यातून पंचायत समिती सदस्य ते थेट खासदार, राहुल गांधींचा विश्वासू सहकारी, देशाचा राजकारण हाकणारा नेता, राजीव सातव यांचा हा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो.” अशी प्रार्थना वडेट्टीवार यांनी केली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button