सत्तेसाठी नेते इटालियन काँग्रेसच्या मांडीवर बसले; मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर कुठे बिघडलं? – अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar

मुंबई : अवैध दारुविक्री केल्याबद्दल शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. सावंत यांची पाठराखण करताना शिवनेनेचे नेते भास्कर जाधव म्हणले – लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडलं? यावर भाजपाचे आ. अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या नेत्यांना टोमणा मारला – सत्तेसाठी नेते इटालियन काँग्रेसच्या मांडीवर बसले; मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर कुठे बिघडलं?

गुहागर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री जाधव एका कार्यक्रमात म्हणाले – लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडल? पोलीसही हप्ते घेतातच ना! पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर अवैध दारुविक्री केल्याने कारवाई केली. त्याबाबत सावंत यांची पाठराखण करताना भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केलं. ८ नोव्हेंबरच्या या कार्यक्रमाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर ट्विट करून टीका – “पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? कार्यकर्त्याच्या समर्थनार्थ माजी मंत्री, सेना आमदार भास्कर जाधवांच धक्कादायक विधान…हो, बरोबर आहे. नेत्यांनी सत्तेसाठी लाज विकली, हिंदुत्व विकले आणि इटालियन काँग्रेसच्या मांडीवर बसले मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर बिघडले कुठे?”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER