वकिलाची वकिलास न्यायाधीशासमोरच मारहाण

मारहाण - तक्रार दाखल
  • भिवंडीतील धक्कादायक घटना

मुंबई : एखाद्या सिनेमाच्या कथेलही लाजवेल अशी घटना भिवंडी कोर्टात (Bhiwandi Court) रविवारी घडली. सुट्टीचा दिवस असला तरी एक कोर्ट चालू असते आणि त्या कोर्टातच दोन वकिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. स्वतः न्यायाधीश या घटनेचे साक्षीदार होते.

ॲड.शैलेश गायकवाड आणि ॲड. अमोल कांबळे अशी या दोन वकीलांची नावे आहेत.एका खटल्याची सुनावणी सुरु असताना आरोपी व फिर्यादीचे वकील  बाजू मांडत होते. युक्तिवाद भांडणांमध्ये बदलला आणि नंतर तो हाणामारीवर आला. रविवारी दुपारी भर कोर्टात घडलेल्या या घटनेने सर्वजण अवाक् झाले.   सदरची घटना पत्रकाराला माहिती पडताच या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला देखील वकिलाने मारहाण करीत धमकी दिली असल्याने पत्रकाराने देखील या मारकुट्या वकिला विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नारपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खटल्याची सुनावणी रविवारी दुपारी सुरु होती. मात्र आपली बाजू मांडतांना  शैलेश गायकवाड आणि अमोल कांबळे यांच्यात भिवंडी न्यायालयातच वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी दोन्ही वकिलांना शांतीनगर पोलीस ठाण्यात आणले. अमोल कांबळे यांनी शैलेश गायकवाड यांच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

या घटनेची माहिती मिळताच पत्रकारांनी पोलीस ठाणे गाठले.  ॲड. शैलेश गायकवाड  पोलीस ठाण्यातच होते. घटनेची माहिती एबीपी माझाचे पत्रकार अनिल वर्मा पोलिसांकडून घेत असताना  शैलेश गायकवाड यांनी वर्मा यांना शिवीगाळ आणि मारहाण केली अशी तक्रार आहे. वर्मा यांनी गायकवाड यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER