राहुल गांधींसमोर शेवटचा पर्याय, भाजपात प्रवेश करण्याचा – निलेश राणे

Nilesh Rane - Rahul Gandhi

मुंबई :- काँग्रेसमध्ये (Congress) सर्वकाही ठीक चाललंय असं दिसत नाही. आज पुन्हा एकदा ही बाब प्रखरतेने समोर आली. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात (BJP) प्रवेश केला. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यादृष्टीने ही चिंतेची बाब आहे. जे ४ नेते राहुल गांधी यांचे शिलेदार मानले जायचे त्यातील आतापर्यंत दोघांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. या चार शिलेदारांमध्ये जितिन प्रसाद (Jitin Prasad) यांचाही समावेश होता. आता यावरुन माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे.

ही बातमी पण वाचा : मी सुपारीचोर आहे तर, निलेश राणेंच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती ; शिवसेनेच्या नेत्याचा टोला 

“राहुल गांधींच्या सगळे जवळचे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे, मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे, अशी मिस्कील टीका निलेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button