शेवटच्या माणसाला लस मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif

कोल्हापूर :- शेवटच्या सर्वसामान्य गोरगरीब माणसाला कोरोना प्रतिबंधक लस मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा विश्‍वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिला. ज्यांची ऐपत आहे त्यांना ही लस बाजारात उपलब्ध झाली पाहिजे आणि गोरगरिबांना मोफत मिळाली पाहिजे, अशी मागणीही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केली.

कागलमध्ये ग्रामीण रुग्णालयात कोरणा प्रतिबंधक लसीचा समारंभपूर्वक वितरण शुभारंभ झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री मुश्रीफ उपस्थित होते मंत्री श्री मुश्रीफ यांनी हीलस रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ सुनिता पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला आणि अदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी ही लस जानेवारीत उपलब्ध होईल असा शब्द दिला होता. बोलल्याप्रमाणे त्यांनी तो शब्द खरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे माझी मागणी आहे की ज्यांची ऐपत आहे त्यांना बाजारात ही लस उपलब्ध करून द्या. तसेच गोरगरिबांना ही लस मोफत मिळालीच पाहिजे, अशी आग्रही मागणीही श्री मुश्रीफ यांनी केली.

यावेळी प्रवीणसिंह पाटील, पंचायत समितीच्या सभापती सौ. पुनम महाडिक – मगदूम, उपसभापती सौ. अंजना सुतार, जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले, प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, डॉ. अभिजित शिंदे, माजी सभापती सौ राजश्री माने आदी प्रमुख उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : अदर पुनावालांनी स्वत: घेतली कोरोनाची लस;  व्हिडीओ व्हायरल  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER