घरमालकाने घरात येऊ दिले नाही; कोरोना रुग्ण महिलेसह कुटुंबाचा मुक्काम दोन दिवस टॅक्सीत!

Mandi - Coronavirus Patient in Taxi

मंडी : काही लोक कोरोना निर्बंधांचे पालन करत नाहीत तर काही काही कोरोनाला (Corona) इतके घाबरतात की, शेजारधर्मही विसरतात. हिमाचलप्रदेशातील (Himachal Pradesh) मंडी (Mandi) येथे एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर घरमालकाने त्या कुटुंबाला घरात येऊ दिले नाही. ते कुटुंब दोन  वर्षांच्या  मुलासह दोन दिवस टॅक्सीत राहिले! हकिकत अशी की, मंडी जिल्ह्यातील करसोग येथे परसराम हा टॅक्सीचालक भाड्याच्या घरात राहतो. दोन दिवसांपूर्वी पत्नीच्या तपासणीसाठी हे कुटुंब शिमला येथे गेले.

चाचणीत पत्नीला कोरोना झाल्याचे निदान झाले. पण, कोरोनाचे प्रमाण कमी होते; तिची प्रकृती चांगली होती. तिला डॉक्टरांनी ‘होम आयसोलेशन’चा सल्ला दिला होता. परसराम शिमला येथून पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलासह घरी आला. परसरामच्या पत्नीला कोरोना आहे हे कळल्यानंतर घरमालकाने त्यांना घरात येऊ दिले नाही. काही न सुचल्याने परसराम, पत्नी आणि त्यांचा मुलगा दोन दिवस त्याच्या टॅक्सीतच राहात होते! त्यांना कुणीही मदत केली नाही.

डीएसपींना मागितली मदत

शेवटी परसरामने  डीएसपी गीतांजली ठाकूर यांना फोन केला आणि मदत मागितली. गीतांजली ठाकूर लगेच परसरामच्या मदतीला आल्या. त्याच्या घरमालकाची भेट घेऊन चर्चा केली.  त्याला समजावले. त्यानंतर घरमालकाने परसरामच्या कुटुंबाला घरात घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button