अरब वाळवंटात काळ सोन शोधून सौदी अरेबियाला श्रीमंत बनवणारा राजा!

Maharashtra Today

भारतात कोरोनाच्या (Corona) वाढत्या संसर्गामुळे ऑक्सीजनची मागणी प्रचंड वाढलीये. भारतात ऑक्सीजन अभावी मरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढलीये. अशा परिस्थीतीत भारताच्या मदतीला सौदी अरेबिया धावून आलाय. त्यांनी भारतासाठी ८० मेट्रिक टन ऑक्सिजन (80 metric tons of oxygen)पुरवलाय. अदानी ग्रुप आणि लिंडे कंपनीच्या सहकार्याने हा ऑक्सिजन भारतात पाठवण्यात आला.

भारताच्या मदतीला धावून येणाऱ्या सौदीचा इतिहास ही मोठा रंजक आहे. एका व्यक्तीनं सौदी नावाचं साम्राज्य उभं केलं त्याच्या नावावरुनच या देशाच नाव सौदी (Saudi) असं पडलं होतं. सौदी देशाचे संस्थापक होते ‘राजा अब्दूल अजीज’ (King Abdul Aziz) जे सामान्यपणे ‘इब्न सौद’ या नावानं ओळखले जातात. १९३२ साली त्यांनी सौदी अरेबियाची स्थापना केली. त्यांचा जन्म १५ जानेवारी १८५७ साली तर निधन ९ नोव्हेंबर १९५३ साली झालं. त्यावेळी हा भाग ऑटोमन साम्राज्याच्या आधिपत्याखाली होता.

इब्न सौदी याचे वहाबी कुटुंबाशी जुने रक्ताचे नाते होते आणि वहाबी चळवळीत त्याचे कुटुंब प्रमुख होते. त्याने तुर्कस्तानच्या सुलतान खलीफाविरुद्ध बंड केले. १९१२ पर्यंत त्याने नेज्दच्या आसपासचा भाग काबीज करून संघटित सैन्य उभारले व पुढे रियाद काबीज केले. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी त्यास मैत्रीचे आमिष दाखविले, परंतु त्याचा शत्रू हेजॅझचा हुसैन ह्यास मदत केली.

राजा म्हणून स्वतःला घोषित केलं

१९२४-२५ मध्ये इब्‍न सौदने हुसैनचा पराभव केला आणि हेजॅझ व नेज्दचा राजा म्हणून स्वतःस जाहीर केले. नंतर शेजारील राष्ट्रांबरोबर त्याने मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून अरबी द्वीपकल्पावर आपली सत्ता दृढ केली आणि आपल्या देशाचे १९३२ मध्ये ‘सौदी अरेबिया’ असे नाव ठेवले. पुढे येमेनचाही त्याने युद्धात पराभव केला. नंतर त्याने अंतर्गत सुव्यवस्थेकडे लक्ष पुरविले. सौदी अरेबियामधील भटक्या लोकांतील कलह मोडून त्यांच्यात सुधारणा घडवून आणल्या.

सौदी अरेबियाला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात मिळवून दिले स्थान

मक्का व मदीनेच्या यात्रेकरूंना होणाऱ्या चोरांच्या उपद्रवाचा बंदोबस्त केला. १९३९ मध्ये त्याने अमेरिकेच्या तेलकंपन्यांना सवलती देऊन उत्पन्न वाढविले आणि त्यातून नवीन रस्ते, बंदरे आणि लोहमार्ग बांधले व रुग्णालये सुरू केली. दुसऱ्या महायुद्धात सौदी अरेबिया तटस्थ होता. इब्‍न सौदने सौदी अरेबियास संयुक्त राष्ट्रांत स्थान मिळवून दिले आणि अरबांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अरब लीगची स्थापना केली. त्यांनी १९३८ साली सौदीतल्या तेल विहरींचा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मोठ्या प्रमाणात त्यांनी तेलाच उत्पन्न घेतलं आणि इथून सौदीच्या भरभराटीला सुरुवात झाली.

२२ लग्न, ४५ मुलं

इब्न सौदचं पहिलं लग्न झालं तेव्हा त्यांच वय अत्यल्प होतं. काही कालावधीतच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. यानंतर इब्न सौदनं वयाच्या १८ व्या वर्षी दुसरं लग्न कलें. त्याच्या पहिल्या मुलाचं नाव ‘तुर्क अल अव्वा’ ठेवण्यात आलं. न्युयॉर्क पोस्ट या वर्तमान पत्रानूसार त्यानं २२ जणींशी लग्न केलं. यांच्याकडून एकूण ४५ मुल जन्मली पैकी ३६ मुलं जगली. या पैकी सात मुलांवर तो अफाट जीव लावायचा. त्यांना सौदीचे सात सितारे म्हणलं जायचं.

मृत्यू

त्यांचा मृत्यू १९५३ला झाल्यानंतर त्यांचा भाऊ सत्तेवर आला परंतू ११ वर्षानंतर सौदीत पुन्हा सत्ता पालट झाला. राजाच्या भाचानच राजाला गोळी मारली होती. यानंतर खालिद हे सौदीच्या गादीवर आले. ते जास्त काळ गादीवर राहू शकले नाहीत. नंतर सौदीच्या सात सिताऱ्यांपैकी सर्वात मोठा मुलगा सौदीचा ‘फहद’ सौदीचा राजा बनला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button