दसऱ्याच्या मुहूर्तावर घर खरेदीचा आनंद

दसऱ्याच्या मुहूर्तावर घर खरेदीचा आनंद

पुणे : पुण्यात (Pune) दसऱ्याच्या (Dussehra) मुहूर्तावर घर, जमीन खरेदी करण्यासाठी शनिवारी (दि.२४) व रविवारी (दि.२५) शहरातील पाच दुय्यम निबंधक कार्यालये सुरु राहणार आहेत, असा आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी जारी केला आहे.

दसरा सणानिमित्त घर खरेदी, दुकाने आणि जमीन आदींचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. या दरम्यान दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची गर्दी होते. दसऱ्याच्या मुहुर्तावर दस्त नोंदणी करण्याचा नागरिकांचा आग्रह असतो. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी कार्यालये सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.

या पार्श्वभूमीवर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी कार्यालये पाच कार्यालये सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय सुट्टी असल्याने सर्व शासकीय कार्यालये बंद असणार आहेत. परंतु घरांची दस्त नोंदणी करण्यासाठी शहरातील पाच दुय्यम निबंधक कार्यालये शनिवारी (दि.24) व रविवारी (दि.25) सुरु ठेवली जाणार आहेत. या निर्णयामुळे अनेकांना घर खरेदीचा मुहूर्त साधता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER