‘मास्टर माइंड हा थक्क करणारा प्रवास’, मनसेचा परबांना टोला

Anil Parab-Raj Thackeray

मुंबई: मनसुख हिरेन हत्याप्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेची कसून चौकशी सुरू आहे. मला पुन्हा सेवेत घेण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी २ कोटींची मागणी केली होती. तसेच राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी कायदा भंग करणाऱ्या कंत्राटदारांकडून ५० कोटींची वसुली करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा सचिन वाझेने आपल्या पत्रात केला आहे. यावरून भाजपसह मनसे आणि अन्य पक्षांनी ठाकरे सरकारवर शरसंधान साधले आहे. मास्टर स्ट्रोक ते मास्टर माइंड (Master Stroke to Master Mind) हा प्रवास थक्क करणारा आहे, असा खोचक टोला मनसेने अनिल परब(Anil Parab) यांना लगावला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे(Sandeep Deshpande)यांनी एक ट्विट करत अनिल परब यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मास्टर स्ट्रोक ते मास्टर माइंड हा प्रवास थक्क करणारा आहे. ‘वकील’ साहेब शपथेवर खोट बोलणं हा गुन्हा आहे हे आपल्याला माहित असेल ही अपेक्षा, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

दरम्यान, वाझे याने केलेले आरोप परब यांनी फेटाळून लावले आहेत. सर्व आरोप धादांत खोटे आहेत. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. माझ्यावर अशा प्रकारचे खंडणीचे कुठलेही संस्कार नाही. म्हणून मी माझ्या दोन मुली आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे सर्व खोटं आहे. हे मला नाहक बदनाम करण्यासाठी आरोप करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button