चीनमधून भारतात जाण्यासाठी जपान सरकार उद्योगांना देणार सबसिडी

Japanese government will subsidize industries from China to India

टोकियो : जपानी उद्योगांनी चीनमधून भारतात जाण्यासाठी जपान सरकार उद्योगांना सबसिडी देणार आहे. यासाठी सरकारने २२१ मिलियन डॉलर सबसिडी घोषित केली आहे.

दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियात स्थलांतरित होणाऱ्या देशांसाठी जपान सरकारने ही योजना घोषित केली आहे. जपानच्या एका वृत्तपत्राने म्हटले आहे की, एका विशिष्ट क्षेत्रात उद्योगांचे अवलंबत्व कमी करण्यासाठी हे धोरण ठरवण्यात आले आहे.

यातून सरकारला, चिकित्सा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा पुरवठा स्थिर राहील, अशी यंत्रणा उभारायची आहे. सध्या जपानची पुरवठा शृंखला चीनवर अवलंबून आहे. कोविड – १९ च्या साथीच्या काळात चीनमधून  होणाऱ्या पुरवठ्यात कपात करण्यात आली होती. जपानच्या या निर्णयाला राजकारणाचीही किनार आहे.

सध्या भारत आणि जपानसह चीनचा शेजारी देशांशी वाद सुरू आहे. दक्षिण चीन सागर क्षेत्रात चीनचा शेजारी देशांसोबत अमेरिकेशीही तणाव सुरू आहे. भारतानेही ‘डिजिटल स्ट्राईक’ करून चिनी कंपन्यांना देशाबाहेर हाकलले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER