आरक्षणाचा विषय कोर्टात सोडवला जाऊ शकतो, रस्त्यावर नाही – अशोक चव्हाण

Ashok Chavhan

मुंबई : मराठा आरक्षणाला सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर भाजप – महाविकास आघाडीत आरक्षणावरून वाद पाहायाला मिळत आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारला कोर्टात टिकवता आले नाही. राज्य सरकारची रणनिती चुकली. विरोधी पक्षनेत्यांच्या या विधानानंतर मराठा आरक्षण समितीचे समन्वयक व महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी यावर प्रत्यूत्तर दिले आहे.

रणनीती चुकली हे फडणवीस सांगतात, जजमेंट वाचावं असे सांगत काही राजकीय नेत्यांना राजकारण करायचं आहे. असे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच, आपण बाजू मांडण्यात कमी पडलोय हे देखील पाहायला हवे असे फडणवीस यांनी म्हटले त्यावर फडणवीस सरकारच्या काळातीलच वकील बाजू मांडण्यास होते असे उत्तर अशोक चव्हाण यांनी दिले आहे. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटल्याप्रमाणे अध्यादेश काढण्याच्या मागणीबाबत विचार करू असेही अशोक चव्हाण म्हणाले. दरम्यान आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, मराठा समाजाला न्याय मिळवून देणारच असे शरद पवार म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER