पोलीस वसाहतींचा प्रश्न अखेरीस मार्गी लावला – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad

मुंबई : ठाण्यातील वर्तकनगर मधील पोलीस वसाहतीचा प्रश्न अखेरीस मार्गी लागला असल्याची माहिती स्वतः गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे.

गेली अनेक वर्षे रखडलेला वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर जितेंद्र आव्हाड यांनी एकाच बैठकीत मार्गी लावला आहे. या वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. येथे 567 घरे ही पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

तर उर्वरित घरे सोडतीद्वारे म्हाडाकडून वितरीत करण्यात येणार आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न आव्हाड यांनी तत्काळ मार्गी लावला आहे. त्यामुळे सबंध पोलीस दलातून आव्हाड यांचे आभार मानले जात आहेत.

या बैठकीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक तसेच सचिव, गृहसचिव आणि म्हाडाचे मुख्य अधिकारी उपस्थित होते. (Thane Police Colony Re-develop by MHADA)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER