मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : विनायक मेटे

Vinayak Mete - Maratha Reservation - CM Uddhav Thackeray

मुंबई : मराठा आरक्षण (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केल्याने मराठा समाजाने (Maratha Community) आक्रमक पवित्रा घेतला आहे . शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनीही महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) टीकास्त्र सोडले . मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळण्यात अपयश आल्याने आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा द्यावाच, परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी मेटे यांनी केली आहे. मेटे यांनी पहिल्यांदाच मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर थेट आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत .

विनायक मेटे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. मराठा समाज न्यायालयाच्या दृष्टीने मागास नाही, हे सुद्धा राज्य सरकारचे पाप आहे. आरक्षण रद्द करण्यात आल्याने आता नवीन कायदा होऊ शकत नाही. या सर्वांना आघाडी सरकार जबाबदार आहे. अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे आणि घोडचुकीमुळे मराठा समाजाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे जनाची नाही तर मनाची असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असल्याने त्यांनी देखील मराठा आरक्षण गांभीर्याने घेतले नाही. त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मेटे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button