महिला अत्याचारात मंत्र्यांचा सहभाग दुर्भाग्यपूर्ण; रक्षा खडसे संतापल्या

Raksha Khadse

जळगाव : महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघड होत आहेत. यात मंत्र्यांचा सहभाग दुर्भाग्यपूर्ण आहे, असा संताप कुणाचेही नाव न घेता खासदार व एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) स्नुषा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी व्यक्त केला.

त्या म्हणाल्यात, राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनात वाढ होते आहे. महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली आहे? महिलांवरील अत्याचारांच्या घटनात काही मोठे लोक आणि मंत्र्यांसारख्या व्यक्तींचा सहभाग असल्याचे कळते हा दुःखाचा विषय आहे.

एकीकडे महिलांचा सन्मान, महिलांना आरक्षण म्हणायचे आणि पदावर बसणाऱ्यांकडूनच महिलांवर अत्याचार होत असतील तर यापेक्षा दुःखाचा विषय महाराष्ट्रासाठी काय असेल?

वीज कापून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या

वीज बिलांसाठी अचानक शेतकऱ्यांचे कनेक्शन पूर्वसूचना न देता कट केले जाते आहे. हे शेतकऱ्यांचे उत्पन्न घेण्याचे दिवस आहेत, सरकारला हे माहिती असताना वीज कापली जाते आहे. महाविकासआघाडी सरकारने वीज वितरण कंपनीला वीज कापण्याचे आदेश दिले आहेत. वीज वितरण कंपनी व मुक्ताईनगर तहसीलदाराना निवेदन देऊन रक्षा खडसे यांनी सरकारचा निषेध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER