घुसखोर हीच काँग्रेसची व्होटबँक, … अमित शाह यांची टीका

congress party & Amit Saha

दिसपूर (आसाम) : “काँग्रेस आणि ऑल इंडिया डेमोक्रेटिक फंडचे संस्थापक बदरुद्दीन अजमल हे घुसखोरांसाठी राज्याचे सारे दरवाजे उघडतील. कारण तीच त्यांची व्होटबँक आहे. काँग्रेसची रणनिती इंग्रजांसारखी फोडा आणि राज्य करा, अशी आहे”, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसामच्या नालबारी येथे विजय संकल्प कार्यक्रमात केली.

“जे कित्येक वर्षांपासून इथे सरकारमध्ये आहेत त्यांनी आसामच्या संस्कृतीसाठी काय केले? असा प्रश्न मला त्यांवा विचारायचा आहे. मत गोळा करण्या व्यतिरिक्त या लोकांनी आणखी काही केले नाही. एनडीएने आसासमध्ये शंकरदेव यांच्या सन्मानार्थ काही महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत”, असे अमित शाह म्हणाले.

काँग्रेसच्या बेगडी धर्मनिरपक्षतेवर टीका करताना ते म्हणालेत, “काँग्रेस अनेकदा भाजपावर सांप्रदायिकतेचा आरोप करते. मात्र, तीच काँग्रेस केरळमध्ये मुस्लीम लीगसोबत आहे तर आसाममध्ये काँग्रेसने बदरुद्दीन अजमलसोबत युती केली आहे. काँग्रेस आसामला कोणत्या दिशेला घेऊन जात आहे?”

“कलम ३७० ला कुणीही हात लावू शकत नव्हते. मात्र, आम्ही त्याबाबतचा निर्णय करुन दाखवला. प्रभू श्रीरामांच्या मंदिर निर्माणासाठी देशभरातून आवाज उठत होता. काँग्रेस इंग्रजांच्या धोरणावर चालत राहिली. लोकांमध्ये फूट पाडा आणि राज्य करा, अशी त्यांची रणनिती आहे. आसाममध्ये इतके दिवस त्यांनी तेच केले. काँग्रेसने लोकांना आपसात लढवत आसामला रक्तरंजित केले. यामध्ये १० हजार पेक्षा जास्त युवकांचे रक्त सांडले आहे”, असं शाह म्हणालेत. (Amit Shah slams Congress in Assam).

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER