
नाशिक : राज्यातील बहुतांश गड-किल्ले अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी येत्या फेब्रुवारी महिन्यापासून १०० किल्ल्यांना भेटी देण्याचा मानस आहे. याचा शुभारंभ नाशिकमधून (Nashik) करणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आज दिली.
संभाजीराजे आज नाशिक दौऱ्यावर होते. राज्यातील दुर्लक्षित गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी राज्यस्तरीय ‘फोर्ट फेडरेशन’ची स्थापना करावी, राज्य पुरातत्व विभागासोबत सामंजस्य करार करुन या फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील गड-किल्ल्यांची पडझड रोखण्याचा निर्धार आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले. पदम्दुर्ग येथे जेट्टी तयार करण्यासाठी परवानगीही मिळाल्याची माहितीही संभाजीराजे यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साक्षीदार अन् महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी सातत्याने चर्चा होते. त्यांनीही किल्ल्यांच्या विकासासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. किल्ल्यांचा विकास होऊन, दुर्ग पर्यटनालाही वाव मिळेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला