राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत पक्षप्रवेशांचा धडाका ; आज जयंत पाटील खडसेंच्या जळगावात

Eknath khadse-Jayant Patil

जळगाव :  राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आजपासून पुढचे दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. माजी भाजपवासी व आताचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा (Eknath Khadse) हा बालेकिल्ला मानला जातो. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पहिल्यांदाच जयंत पाटील आज जळगाव दौ-यावर जात आहेत.

जयंत पाटील यांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील अनेक जण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच, भाजपला रोखण्यासाठी या दौऱ्यात रणनीती आखण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

तर, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे. तेव्हा जळगाव जिल्ह्यातही पक्ष एक नंबरवर यायला हवा. हे यश खेचून आणायचे आहे, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ही यात्रा काढली आहे. मात्र, प्रत्यक्षात कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच त्या त्या भागातील इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याचा धडाकाही राष्ट्रवादीने लावला आहे.

आज जळगाव दौ-यात ्अनेक जण राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

ही बातमी पण वाचा : अजितदादांच्या जिल्ह्याची सुत्रे यंदाही फडणवीसांकडेच?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER