लडाख; भारताच्या गस्ती पथकाला चीनने काही वेळ ताब्यात घेतले होते !

Xi Jinping - Ladakh

लडाख : बुधवारी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर चीनने सीमेवर पहारा देणाऱ्या भारतीय लष्कर आणि इंडो तिबेटीयन बॉडर्र पोलिसांच्या गस्ती पथकाला काही वेळ ताब्यात घेतले व जवानांची शस्त्रे सुद्धा काढून घेतली होती. नंतर या जवानांना चीनने सोडले व त्यांची शस्त्रेही परत केली.

गेल्या काही दिवसांपासून चीन लडाखच्या सीमेवर तणाव निर्माण करण्याच्या कारवाया करतो आहे. बुधवारी मध्ये परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. नियंत्रण रेषेजवळ भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये मोठया प्रमाणात तणाव आहे. चीनने इंडो तिबेटीयन बॉडर्र पोलिसांच्या गस्ती पथकाला ताब्यात घेतल्यानंतर तणाव वाढला होता. दोन्ही बाजूच्या कमांडर्समध्ये बैठक झाल्यानंतर परिस्थिती निवळली. ही सर्व माहिती पंतप्रधान कार्यालयाला कळवण्यात आली आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, चीन या भागात सतत वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतो. २०१५ पासून चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीच्या घटनांमधील ८० टक्के घटना या चार भागांपुरत्या मर्यादित आहेत. यातले तीन भाग हे पश्चिम सेक्टरमध्ये येणाऱ्या पूर्व लडाखमधले आहेत.

घुसखोरीच्या एकूण घटनांपैकी ट्रिग हाइटस आणि बुर्त्से या लडाखमधील दोन भागांमध्ये चीनकडून घुसखोरीच्या दोन तृतीयांश घटना घडल्या आहेत. २०१९ पासून चीनने दमचिलीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या दोलीटँगो या नव्या एका भारतीय भागामध्ये घुसखोरी सुरु केली. २०१९ मध्ये चीनने इथे ५४ वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याआधीच्या चार वर्षात चीनने तिथे फक्त तीन वेळा घुसखोरी केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER