PoK मध्ये ‘पिनपॉईंट स्ट्राईक’चे वृत्त भारतीय लष्कराने फेटाळले

Indian Army

नवी दिल्ली : आज सायंकाळनंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी लॉन्चपॅड उद्ध्वस्त केल्याचे खळबळजनक चर्चा काही माध्यमांवर प्रसारित झाले. यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचंही सांगितले जात होते. मात्र, काही वेळातच भारतीय लष्कराने (Indian Army) हे वृत्त फेटाळले. सीमेवरील नियंत्रण रेषेवर गोळीबार झाला नाही, असा खुलासा भारतीय सैन्याने केला. (Indian Army clarify over news of Pinpoint Strike over terrorist launch pad in PoK).

सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारताने १३ नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांच्या काही बंकरवर हल्ला केला होता. यात अनेक बंकर्स उद्ध्वस्त झाले. भारतीय सैन्याने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत सांगितलं आहे, ‘आज नियंत्रण रेषेवर कोणत्याही प्रकारचा गोळीबार झालेला नाही.’

दरम्यान, भारतात आलेला कोणताही दहशतवादी जीवंत परत जाणार नाही, असा इशारा भारताचे लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी घुसखोरांना दिला. जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे आज पहाटे झालेल्या अतिरेकी आणि भारतीय जवानांच्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या चार अतिरेक्यांना उडवण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER