मूर्ती लहान पण…

Melati and Isabel Wijsen

मेलाती आणि इसाबेल विजसेन (Melati and Isabel Wijsen), वय अवघ दहा वर्ष आणि बारा वर्ष ! खरंतर प्लास्टिक प्रदूषण करणाऱ्या देशांच्या क्रमवारीमध्ये इंडोनेशिया चा दुसरा क्रमांक लागतो. आणि आणि मग त्यामुळे दृष्ट लागावी तसा याचा शाप अतिशय सुंदर असलेल्या बाली बेटाला बसतो. जावा आणि लंबोक या दोन बेटांच्या मधोमध असलेलं बाली हे इंडोनेशियन द्वीपसमूहातलं एक सुंदरस बेट. नेहमीच अनेक पर्यटकांना मोहवणार ,उत्तम सांस्कृतिक वारसा असलेले, नीरव शांतता आणि शुद्ध मोकळी हवा असल्यामुळे सतत पर्यटकांचा ओघ सतत इकडे वळत असतो. आणि मग बाहेरचे लोक आले म्हटल्यानंतर तोच देश जणूकाही “प्लास्टिकचा डेपो” बनत जातं .अशीही ही आपल्या बालीची होणारी अधोगती या दोघी, बहिणींना सहन झाली नाही. आणि त्यांनी या विरोधी “बाय-बाय प्लास्टिक बॅगस्” या संस्थेची स्थापना केली.

प्रश्न पडतो की अवघ्या दहाव्या किंवा बाराव्या वर्षापर्यंत मुला यांना स्वतःच्या वस्तू स्वतः आणि ठेवणे एवढेही ही लक्षात येत नाही. आपल्या खोलीतला पसारा देखील समजत नाही त्या पार्श्वभूमीवर इतक्या छोट्या वयामध्ये अशा कामाला, जनजागृतीला या दोघी बहिणी उभ्या राहतात. हे बघून खरोखरच मूर्ती लहान पण कीर्ती महान याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

म्हणजे या छोट्या वयामध्ये हि ऊर्जा, ही दिशा ना त्यांना मिळाली कुठून ?आणि म्हणूनच या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला. तर बाली मधील ,त्या घनदाट राई मधून थोडा प्रवास केल्यानंतर, अतिशय घनदाट जंगलामध्ये लपलेल्या बंडूंग प्रांतातल्या अबायनसेमाल या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण बांधकामातील चार मजली झोपड्यानी उभारलेली ,अशी एक इमारत दिसते. (ही पूर्ण पणी गवत, बांबू आणि इतर नैसर्गिक वस्तूंनी बांधलेली आहे ,हे विशेष!) तिथे पर्यावरण पूरक पर्यायी शिक्षण पद्धतीचा प्रसार करण्यासाठी, जॉन आणि सिंथीया हार्डी या दाम्पत्याने 2008 मध्ये सुरू केलेल्या “ग्रीन स्कूल “चे दर्शन घडते. या शाळेमध्ये 41 देशांमधली पाचशे मुले 470 तिथली स्थानिक मुलं शिक्षण घेतात. चेंज मेकर्स म्हणजे बदल घडवणारे शिल्पकार घडवणं हेच या शाळेचे ध्येय आहे.

मुलांच्या मनामध्ये कायमस्वरूपी विकासाची कल्पना रुजवणं, त्यांच्या सर्जन शक्तीला आणि विचारशक्तीला मोकळा अवकाश देणे हे अतिशय छोट्या छोट्या गोष्टींमधून या शाळेत चालते. पूर्णपणे हरित इंधनावर चालणारी बायोबस देखील आहे. समुद्र जीवनाची, प्रवाळांची ओळख एक तर इथे होतेच. परंतु विशेष वैशिष्ट्य असं की ही शाळा ,शाळा ,समाज ,शिक्षण ,पालक आणि इतर घटकांना एकत्रित घडणाऱ्या “कुल कुल “या पारंपरिक बाली विचार पद्धतीतून निर्माण झाली.

जगभरामध्ये चाललेल्या ,सकारात्मक कार्य करणाऱ्यांची ओळख करून देऊन ,कायम मोठाली कार्य करणारी प्रेरणादायी व्यक्तिमत्व, त्यांचं जीवन यासंबंधी परिचय देणं दररोजच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समस्या तयार करणाऱ्या माणसांच्या संख्येत भर न घालता समस्या सोडवणारे म्हणजे “प्रॉब्लेम सोल्वर्स “बनवणे हे या शाळेचे ब्रीद आहे. आणि त्यासाठी आवश्यक स्वातंत्र्य दिले जाते.

अशा शाळेतून बाळकडू मिळाल्यामुळे, मेलाती आणि इसाबेल, यांना दोघींना जाणवायचं, समुद्रात पोहायला गेल्यावर सगळ्या अंगाभोवती प्लास्टिक गोळा होते. आणि इतर आणि देशांना जमते ते आपल्या देशाला का नाही जमत ? आपल्या देशाचा प्लास्टिक प्रदूषणामध्ये दुसरा नंबर लागतोच कसा ? आणि या ताकदीतून त्यांनी बाय बाय प्लास्टिक बॅग ही संस्था आकाराला आणली.

आपल्याकडील अनुभवावरूनही हे सोपे काम नोहे , हे आपल्याला अनेकदा समजून चुकले आहे. कित्येकदा प्लास्टिक पिशव्या विरोधी नियम केले गेले. तरी अजूनही कॅरीबॅग बंदी आणू शकलेले नाही. भरपूर मोठा कचरा हा अजूनही प्लास्टिकचाच आहे. आणि जोपर्यंत प्लास्टिकच्या वापराला योग्य पर्याय येत नाही , तोपर्यंत ते सगळ्यात जास्त सोयीस्कर वापरण्यासाठी ठरतो आहे.

कुठल्याही देशात इतकी वर्ष बेसुमार प्लास्टिक उत्पादन आणि वापर करण्याची सवय तोडण्यासाठी काम करणे हे येरागबाळ्याचे काम नाही.

स्थानिक सरकार, उत्पादक ह्यांना पटवण्यासाठी,कायदा मान्य करून घेण्यासाठी त्यांनी जनहितयाचिका तर या बहिणींनी दाखल केली. दीड वर्षापर्यंत यावर काहीच प्रतिक्रिया कोणी दिली नाही. शेवटी वय लहान दोघींचा धीर सुटत चालला होता.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परकीय बाली बेटावरील मुलींना प्रेरणा दिली ती आपल्या भारतीय नेत्याने ! आणि परत एकदा “तुझ आहे तुझपाशी” हा प्रत्यय आला. त्यांनी भारतभेटी मध्ये. साबरमती आश्रमाला भेट दिली होती आणि तेव्हा महात्मा गांधी या साध्या माणसाने केवळ विचार आणि शांततेच्या मार्गाने दिलेल्या लढ्याची कहाणी त्यांनी ऐकली होती .यातून प्रेरणा घेत गांधींच्या उपोषण आणि सत्याग्रहाचा मार्ग त्यांनी अनुसरला आणि त्यासाठी एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा आहार तज्ञांचा सल्ला घेण्याचा विवेकी मार्गही त्यांनी स्वीकारला. आणि काय आश्चर्य ! चोवीस तासाच्या आतच त्यांना गव्हर्नरने भेटीला बोलावलं आणि आणि बालीमध्ये अखेर प्लास्टिकच्या वापरावर बंदी राहील यावर शिक्कामोर्तब झाले.

2018 पर्यंत प्लास्टिक मुक्त करण्याचे आश्वासन बालीच्या गव्हर्नर नी दिले होते. पण ते फारसे प्रत्यक्ष होताना न दिसल्यामुळे त्या बहिणींना दबावाचा उपक्रम चालूच ठेवावा लागला. त्यासाठी अनेक ठिकाणी भाषणे ,व्याख्याने, अगदी संयुक्त राष्ट्र पुढे देखील त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आणि 2019 मध्ये बालीमध्ये पुनर्वापर करण्यास योग्य अशा प्लॅस्टिकवर बंदी आणणारा कायदा झाला. ही चळवळ आता जगभर पसरते आहे. त्यासाठी त्यांनी जनजागृती कार्यशाळा , साफसफाई मोहिमा आखून महात्मा गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकत कार्य केले हे विशेष !

आता बाली बेट परत आपले शांत ,शुद्ध आणि हिरवगार, समृद्ध सौंदर्य अंगाखांद्यावर बाळगत आहे. याचं श्रेय मेलाती आणि इसाबेल या दोघींना जाते.

मध्यंतरी कल्याण येथील,’ वेध ‘ या आयपीएच् संस्थेच्या उपक्रमात, डॉ. मेधा ताडपत्रीकर यांची मुलाखत ऐकली. त्या प्लास्टिक वर भरपूर काम करतात. अनेक वर्षांपासून प्रयोग करत करत त्यांनी काही मशीन्स बनवल्या, काही यशस्वी ठरल्या, या त्या अगोदर काही अपयशी ठरल्या ! पण आता त्यांनी बनवलेल्या मशीनद्वारे वायु आणि इंधन हे वेगळं होतं आणि त्यातून जो टाकाऊ पदार्थ उरतो त्याचा उपयोग रस्ते बांधणी साठी होतो .ज्यातून अत्यंत टिकाऊ असे रस्ते निर्माण होऊ शकतात असं त्या सांगतात. आता त्या मशीन्स पण वितरित करतात. त्याचबरोबर सुरवातीला त्यांनी आपल्या या पदरच्या पैशांनी सगळे प्रयोग केले, त्यानंतर प्लास्टिक मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याच्या जवळजवळ अडीच हजार घरांमधून प्लास्टिक गोळा केले .त्यांना मुंबई होऊनही अशी विचारणा करण्यात आली होती. सुरुवातीला ते सगळे प्लास्टिक त्यांनी पुण्यातच गोळा केले. आता मात्र कल्याण, डोंबिवली याही ठिकाणी असे प्लांट उभे आहेत. काही खेड्यांशी पण त्यांनी टायप केलेले आहे. पंचवीस एक लोक त्यांच्याकडे कामाला आहे.

खरं म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल आणि प्लास्टिक पिशव्या यांचा अतिशय मोठया प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे. मध्यंतरी अस एक आवाहन ऐकलं होतं की, सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या, या प्लास्टिकच्या बॉटल्स मध्ये भरून त्याचा उपयोग बांधकामासाठी करता यावा. सगळ्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या ,ज्या काय आपल्याकडल्या निघतील त्या या प्लास्टिक बॉटल मध्ये भरून पॅक कराव्या, जेणेकरून जनावरांच्या पोटामध्ये प्लास्टिक जाणार नाही. त्याचप्रमाणे वरती डॉक्टर मेधा जे काम करतात, त्यात त्यांनी जो खेड्यांची टायप केला, त्यात उद्देश हाच की बरेचदा खेडेगावांमध्ये गॅस जरी सगळ्यांकडे स्वयंपाकाला पोचले असले तरी पाणी तापवण्यासाठी मात्र लाकडं किंवा प्लॅस्टिकच्या कागदाचा उपयोग होतो. त्यातून प्रदूषित वायू निर्माण होतात आणि निर्माण झालेली राख ते शेतात वापरतात . त्यातून येणारच धान्य आणि भाजीपाला आपल्या खाण्यात येतो आणि नकळत तो दररोज आपल्या शरीरात जात राहतो. एवढा दूरदर्शी विचार केला त्यांनी !

गरज आहे ती असे लोक जे काम करतात त्या लोकांना , आपल्याकडून एवढी होईल तेवढे मदत करत राहणे. नाहीतर हा अतिशय गंभीर असा प्रश्न आहे. पण हातात हात घालून जे काम केलं जातो ते नेहमीच यशस्वी होतं. तसं स्वरूप या कामाला देऊ या !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button