बिग बॉसमध्ये येणारी राखी सावंत करुन देणार पतीची ओळख

Rakhi Sawant

बॉलिवुडमध्ये (Bollywood) काही ना काही कारणाने सतत चर्चेत राहणारे नाव म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant). मिका सिंहने (Mika Singh) त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिचे चुंबन घेतले म्हणून राडा करणारी राखी. शाहरुखबाबत विधान करणारी राखी, राजकारणात आलेली राखी, बॉलिवुडमधील वेगवेगळ्या विषयांवर बिनधास्त मत प्रदर्शन करणारी राखी आणि तेवढ्याच बिनधास्तपणे अंग प्रदर्शन करणारी राखी. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या राखीची अनेक रुपे समोर आलेली आहेत. बिग बॉसच्या (Big Boss) पहिल्या पर्वातही राखीने चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता राखी पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन जाणार आहे. आणि ती यावेळी तिच्या पतीची ओळख करून देणार असल्याचे म्हटले जात आहे.

खरे तर यापूर्वी राखीच्या लग्नाच्या इतक्या बातम्या आल्या होत्या की आता तरी तिच्या या बोलण्यावर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न पडतो. सोशल मीडियावर राखीने नववधूच्या रुपातील अनेक फोटो शेअर केले होते. पण पतीचा फोटो कधीही शेअर केला नव्हता. राखीने गेल्या वर्षी एका एनआरआय बिझनेसमनसोबत लग्न केल्याचे म्हटले जाते. खरे तर तेव्हा राखीने मी लग्न केले नसून ते ब्रायडल शूट होते असे सांगून लग्न केल्याच्या बातमीचे खंडन केले होते. पण आता राखीने लग्न केल्याचे मान्य केले आहे. राखीने सांगितले. मी चार-पाच जणांच्याच उपस्थितीत एनआरआय बिझनेसमनसोबत लग्न केलेले आहे. माझ्या पतीला मीडियासमोर यायला आवडत नाही. त्यामुळे मी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नाहीत. परंतु आता त्याला सगळ्यांसमोर आणण्याची वेळ आली आहे. मी आता बिग बॉसच्या घरात जाणार असून तेथील प्रत्येक सदस्याशी त्याची भेट घालून देणार आहे. सलमान खानही मला माझ्या पतीबाबत विचारू शकतो त्यामुळे त्याला समोर आणणे आवश्यक आहे असेही राखीने म्हटले.

पतीची ओळख लपवण्याचे कारण विचारले असता राखीने सांगितले, खूप कठिण परिस्थितीत माझे लग्न झाले. लग्नाची मी घोषणा करू शकली नाही. आमचे लव्ह कम अरेंज मॅरेज आहे. माझा पती लंडनमधील एक बिझनेसमन आहे. गेल्या दोन वर्षात माझ्या जीवनात खूप चढ-उतार आले. करिअर डाऊन झाले. माझ्याकडे काही कामही नव्हते. त्यातच मी जे काही पैसे साठवले होते ते पैसे घेऊन एक जण पसार झाला. त्याने मला धोका दिला. माझा पैसा आणि वेळ वाया गेला. पण आता मी पुन्हा करिअरकडे गंभीरतेने लक्ष देणार आहे. बिग बॉस 1 च्या वेळी मी नवीन होते पण आता मी मॅच्युअर्ड झाली आहे. असेही राखी म्हणाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER