
मुंबई : येत्या २०जानेवारीपर्यंत ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील विद्यापीठातील महाविद्यालये सुरू करण्याचा विचार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्यातील प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरती प्रक्रियेविषयी देखील उदय सामंत (Uday Samant) यांनी घोषणा केली आहे.
त्यानुसार प्राचार्यांची २६० पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यापीठातील ४९ संविधानिक पदे भरण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर अर्थमंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकानंतर प्राध्यापकांची भरती रोखण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू करता येतील का किंवा त्यासाठी काही नियमावली तयारी करावी याचा विचार केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर प्रक्रियेची मुदत वाढवण्याची मागणीही आला आहे. त्यामुळे पालक आणि केली जात होती. त्यानुसार १५ विद्यार्थ्यांच्या मनात चिंता असणे तारखेपर्यंत पॉलिटेक्निक आणि तंत्र स्वाभाविक आहे. मात्र या सगळ्याचा विभागाच्या सगळ्या प्रवेश प्रक्रियेची विचार करून आणि खबरदारी मुदत वाढवण्यात येणार आहे. परंतु घेऊनच महाविद्यालये इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचा निर्णय भविष्यात घेण्यात येईल, असे याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट आश्वासन उदय सामंत यांनी दिले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला