कोल्हापूर पोलिसांचे माणूसपण

Kolhapur Police

कौल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जंगलातून चालत आलेले मध्यप्रदेशचे २६ मजूर तसेच कर्नाटकातून चालत आलेल्या उत्तरप्रदेशच्या दोघाजणांना कोल्हापूर पोलीसांनी त्यांच्या गावी पोहचविले. पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी या कमी पुढाकार घेतला.

सिंधुदुर्गमधून जंगलातून 11 मेला चालत मध्यप्रदेशचे २६ मजूर राष्ट्रीय महामार्गावरुन जातना कोल्हापूर पोलीसांना मिळून आले. उत्तर प्रदेशचे मजूर कर्नाटकमधून महामार्गावरुन चालत जात होते. या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस दलातर्फे चालवत असलेल्या फार्मसी कॉलेज उजळाईवाडी विमानतळ रोड येथील निवारा गृहांमध्ये दाखल केले होते. निवारा गृहामध्ये त्यांची खाण्यापिण्याची सोय केली.

उत्तर प्रदेशच्या दोन मजुरांना रेल्वेने त्यांच्या राज्यांमध्ये आज रवाना केले. तसेच मध्यप्रदेशच्या 26 मजुरांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मध्यप्रदेश हद्दीपर्यंत रवाना केले. या मजुरांनी पोलीस दलाचे व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला