घरकाम करणारी मोलकरीण ‘अशी’ बनली दिल्लीची ‘क्राइम क्वीन’!

Maharashtra Today

अपराधाच्या जगतातल्या अनेक कहाण्या आपण ऐकल्यात. बादशहांच्या या जगात एक ‘राणी’ स्वतःच अस्तित्त्व टिकवून आहे. जिचा गेल्या ३० वर्षांपासून दिल्लीवर एक हाती होल्ड आहे. गुन्हेगारीत एकापेक्ष एक बाप माणसं या असले तरी ही स्त्री गुन्हेगारीत सर्वात पुढं होती. नाव होतं बसीरन!

अनेक वर्षांच्या तपासानंतर दिल्ली पोलिसांना बसीरन (Basiran) यांना पकडण्यात यश आलं होतं. बसीरन ६५ वर्षांच्या आहेत. त्यांच्या आठ मुलींच्या मदतीनं त्या दिल्लीसह आजूबाजूच्या इलाक्यावर गुन्हेगारीचं काम करायच्या. अपहरण, खंडणी, सुपारी घेऊन हत्या असे एकूण ११३ गुन्हेगारी खटले त्यांच्यावर दाखल करण्यात आलेत. पोलिसांपर्यंत पोहचलेले ११३ जण आहेत. ज्यांनी आवाज उठवलाच नाही त्यांची संख्या कितीये हे सांगण आत्ताही कठिण आहे. स्वतः तपासकर्ते सांगतात शेकडो लोकांनी बसीरन यांच्या दहशतीला घाबरून पोलिस स्टेशनची पायरी चढलेली नाही.

पोलिसांनी व्यवस्थीत सापळा रचून बसीरन यांना पकडलं. ही अटक २०१८ला झाली होती. याच्या आधी ३० वर्ष बसीरन पोलिसांपासून लपत गुन्हेगारीचं साम्राज्य मोठं करत राहिली. तिची कहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणं नाहीये. न तिला कोणाचा बदला घ्यायचा होता न ती लहनपणापासून गुन्हेगारांमध्ये वाढली. वयाच्या ४५ वर्षांपर्यंत ती एक सामान्य महिला होती.

बकऱ्या चरवणाऱ्याची पत्नि गुन्हेगार बनली

बसीरनचा जन्म आग्र्यातल्या सामान्य कुटुंबात झाला. तिच्यासोबत त्या परिवारात अर्धा डझन मुलं होती. वडीलांवर कुटुंबाची जबाबदारी वाढत होती म्हणून बसीरनचं लहान वयातच लग्न करण्यात आलं, धौलपूरच्या मलखान यांच्याशी. माहेरी सुख आणि सृद्धीच तोंड न बघणाऱ्या बसीरन यांना वाटलं होतं की आता पती त्यांची स्वप्न पुर्ण करेल. सासरी गेल्यावर तिला कळालं की पति पशुपालक आहे. तिचं स्वप्न भंगलं.

तरी मलखान पत्निसाठी शक्य ते सर्व करण्याच प्रयत्न करत होते. काही वर्षातच बसीरन यांनी मुलीला जन्म दिला. एक दोन करत एका पाठोपाठ एक आठ मुलांना बसीरन यांच्या पोटी जन्मल्या. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी काहीच साधन गावात मिळत नसल्यामुळं बसीरनला घेऊन तिचा पती दिल्लीला आला. दिल्लीच्या संगम विहारमध्ये ते राहू लागले. तिचा पती इलेक्ट्रिशन म्हणून काम पाहू लागला. येतान त्यानं गावतल्या बकऱ्यासुद्धा सोबत आणल्या होत्या. त्यांच दुध विकायला देखील मलखाननं सुरुवात केली.

वेळसोबत गोष्टी बदलल्या त्यांनी ८ मुलींसह ४ मुलांन जन्म दिला. मलखानचं उत्पन्न पुरेस नव्हतं. तेव्हा बसीरन यांनी कुटुबांची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यांनी मोलकरणीचं काम सुरु केलं. ती हॉटलेमध्ये भांडी धुवायलाही जायची. गुन्हेगारीचं जग इथून तिच्यासाठी बरंच जवळ पोहचलं होतं. वाढीव उत्पन्नासाठी तिनं बेकायदेशीरपणे दारु विकायला सुरुवात केली.

आधी दारु बेकायदेशीरपणे पणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची. नंतर काम वाढू लागलं तर मुलांनासुद्धा या गुन्ह्यात सामील करायला सुरुवात केली. हळू हळू तिनं हा व्यवसाय स्वतःच्या हातात घ्यायला सुरुवात केली. मलखानला याची काहीच भनक नव्हती. यानंतर बसीरनची ओळख शकिल आणि शमीम या गुन्हेगारांशी झाली. यानंतर त्यांनी बसीरन यांच्या मुलांना चोरी करायचं प्रशिक्षण दिलं. बसीरनची चारी मुलं या धंद्यात उतरली.

सरकारी पाण्यावर कब्जा

बसीरन झोपडीसाडून कच्च्यात घरात राहू लागली आणि नंतर हे घर बंगल्यात बदललं. मलखानला हा अंदाज आला होती की तिची पत्नी आणि मुलं कोणत्या रस्त्यावर आहेत पण तो लाचार होता तो काहीच करु शकत नव्हता. घरात पैसे येत होते. मुलांना उपाशी झोपावं लागत नव्हतं. बघता बघता चोरीमारीचा गुन्हा खंडणी वसुली करण्यात बदलला. तिच्या आठ मुलांच्या जीवावर तिनं १० वर्षात मोठं नेटवर्क बनवण्यात बसीरनला यश आलं. यानंतर तीनं मुलांच्या मदतीनं सरकारी पाण्याच्या पंपावर आपलं अधिपत्य सांगितलं. अवैधपणे ती पाणी वितरीत करु लागली. सामान्य लोकांकडं पाणी पैसे देऊन खरेदी करण्याशिवाय पर्याय नव्हता.

बसीरन आता ‘डॉन’ बनली होती. तिचा विरोध करणाऱ्याला जबर मारहाण केली जायची. उरलेले लोक आपोआप शांत व्हायचे. आता ती सुपारी घेऊन हत्या करु लागली. काही हजार रुपयांसाठी एखाद्याची हत्या करणं तिच्यासाठी अवघड गोष्ट नव्हती. बसीरनच्या या गुन्हेगारीपासून तिच्या मुलींना तिनं दुर ठेवलं होतं.

गुन्हेगारी वाढली

२००२मध्ये पहिल्यांदा बसीरनवर गुन्हा दाखल झाला. अटक होऊ नये म्हणून तिनं जंगलात अड्डे आधीपासूनच बनवले होते. जेव्हा तिच्यावर गुन्हा दाखल झाल्याची खबर तिच्या कानावर आली तिनं मुलांना सोबत घेऊन जंगलातले अड्डे जवळ केले. नंतर मोठ्या शोधानंतर तिला अटक झाली. अनेकदा ती तुरुंगात जायची नंतर ती जामीनावर सुटायची. बसीरनचा मोठा मुलगा वकील याच्यावर १०, शकीलवर १५, शमीम उर्फ गुंगा याच्यावर ६१ तर सन्नीवर चार गुन्हे दाखल होते. फैजलवर ३, राहूल खानवर ३ आणि एका १६ वर्षाच्या नाबालिक मुलावर १ केस होती.

यानंतर पोलिसांची सातत्यानं नजर बसीरन आणि तिच्या गँगवर होती. ‘मिराज मर्डरकेस’ मध्ये पोलिसांनी बसीरनच्या मुसक्या आवळण्याची संधी मिळाली झालं असं होतं, की मेरठच्या मिराज यांच्या सावत्र बहिणीन मिराजच्या हत्त्येसाठी तिनं साठ हजारांची सुपारी बसीरनला दिली होती. मिराजची बहिण धोक्यानं भावाला अड्ड्यावर घेऊन आली. यानंतर बसीसरन गँगच्या लोकांनी त्याला दारु पाजली आणि जंगलात नेऊन त्याची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला.

पोलिसांनी रचला सापळा

पोलिसांना बसीरन गँगवर संशय होता त्यांनी बसीरनच्या मोठ्या मुलाला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्यानं सत्य सांगितलं. यानंतर तीन चार महिन्यांच्या शोधानंतर बसीरनला अटक झाली. पोलिसांच्या खबरींनी पोलिसांनी ठिकाण कळवलं. पोलिसांनी बसीरनला अटक केलं. सोबतच तिची तिन मुलै कैदेत आहेत. या अटनेनंतर दिल्लीतल्या गुन्हेगारीचा एक अध्याय संपतो की पुन्हा सुरु होता यावर सर्वांच लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button