आजपासून हॉटेल झाली सुरू

Hotels Open

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना (Corona) मुळे बंद असलेली हॉटेल, बार,रेस्टॉरंट आज सोमवारपासून सुरू झाली. दरम्यान ग्राहकांसाठी हॉटेल (Hotel), बार (Bar), रेस्टॉरंट (Restaurant) रात्री 11 पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी कोल्हापूर (Kolhapur) हॉटेल मालक संघाने केली.

यापूर्वी कोरोना काळात लॉकडाऊन (Lockdown) अंतर्गत मार्च्या शेवटच्या आठवड्यापासून देशभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आली होती. कोरोनामुळे देशभरातील पर्यटन व धार्मिक स्थळांना बंदी घातल्याने पर्यटन व्यवसायही ठप्प होता. केंद्र व राज्य शासनाने साडेतीन महिन्यांनंतर काही अटी शिथिल करताना 33 टक्के हॉटेल लॉजिंगला परवानगी दिली. पण रेस्टॉरंट बंदच ठेवले. नंतर रात्री 9 वाजेपर्यंत पार्सल सेवेला परवानगी दिली.

दरम्यान, शासनाने लॉकडाऊनमधील काही अटी शिथिल केल्यानंतर दि. 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट व बार सुरू करण्यास परवानगी दिली. पण शासन आदेशात वेळेची मर्यादा काय असावी याबाबत कोणता उल्लेख नाही. त्यामुळे हॉटेल व्यवसायकांमध्ये संभ-म आहे. सहा महिने हा व्यवसाय शंभर टक्के बंद ठेवण्यात आल्याने मोठ्या तोट्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीत बहुतेक हॉटेल व्यावसायिकांनी रात्री अकरापर्यंत हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केलीआहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER