त्वचेला खाज सुटल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय

si 1

त्वचेला खाज येणे ही अतिशय त्रासदायक गोष्ट आहे. त्वचेला खाज सुटण्याची अनेक कारणे आहेत. कधी एखाद्या वस्तूची किंवा पदार्थाची अॅलर्जी झाल्याने, कोणत्या जंगली झाडांना हात लागल्याने, किडे चावल्याने, एखादा साबण किंवा प्रसाधन वापरल्याने किंवा त्वचेचा एखादा विकार उद्भविल्याने त्वचेला खाज सुटू शकते .अतिप्रमाणात खाजवल्यास त्वचेला हानी पोहचून संसर्ग होण्याचा धोका असतो. मग यापासून बचावण्यासाठी तुम्ही घरीच हे काही नैसर्गिक उपाय करून पहा यामुळे कंड सुटण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

  • si-coconut oilखोबरेल तेल :- कधी त्वचेच्या शुष्कतेमुळे तर कधी कीटकाच्या दंशामुळे शरीराला खाज येण्याची शक्यता असते. अशावेळेस त्यावर खोबरेल तेल चोळल्यास त्यापासून आराम मिळवण्यास नक्कीच मदत होते. जर शरीरावर सर्वत्र खाज सुटत असेल तर कोमट पाण्याच्या बाथटबमध्ये पडून रहा. त्यानंतर शरीर कोरडे करून शरीराला तेल लावा.

ही बातमी पण वाचा : हिवाळ्यात अशी घ्यावी केसांची काळजी

si - tulsi

  • तुळस :- तुळशीतील औषधी गुणधर्म शरीरावरील खाज कमी करण्यास मदत करतात. तुळशीची पानं त्वचेवर खाज येत असलेल्या भागावर चोळा. किंवा पाण्यात काही तुळशीची पाने टाकून काढा बनवा. त्या पाण्यात कापसचा बोळा किंवा कपडा बुडवून तो खाज येत असलेल्या भागावर लावा.
  • कोरफड :- कोरफडातील औषधी गुणधर्म त्वचेतील दमटपणा योग्य प्रमाणात राखण्यास व त्वचेला थंडावा देण्यास मदत करतात. कोरफडातील गर खाज येत असलेल्या भागावर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे खाज कमी होण्यास मदत होईल.

si- lemon

  • लिंबू :- ‘व्हिटामिन सी’ने युक्त लिंबात ब्लिचिंग क्षमतादेखील असल्याने त्वचेचा कंड कमी होण्यास मदत होते. तसेच लिंबामुळे त्वचेत होणारी दाहकता कमी होते. त्वचेच्या ज्या भागावर खाज सुटते तेथे लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. वार्‍यावरच हे थेंब सुकू द्या. काहीवेळाने तुम्हाला त्रास कमी होत असल्याचे जाणवेल.

ही बातमी पण वाचा : हेल्मेट वापरल्याने पडू शकते टक्कल

Oat Meal

  • ओटमील :- हा पदार्थ नाश्ता म्हणून अतिशय उत्तम तर आहेच, पण ओटमीलची पावडर त्वचेला लावल्याने त्वचेची खाज कमी होण्यास मदत होते. या मध्ये अँटीइन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असल्याने खाज कमी होऊन पुरळ आले असल्यास ते ही कमी होते. चेहऱ्यावर लावण्यासाठी हा उपाय सुरक्षित आहे. हा उपाय करण्यासाठी ओटमीलच्या एक कप पावडरमध्ये पाणी मिसळून त्याची घट्टसर पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्यावर अर्धा तास लाऊन ठेऊन मग कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा.

ही बातमी पण वाचा : डॅन्ड्रफमुळे डोकं खाजवतंय ? मग करा हे घरघुती उपाय

si-baking soda

  • बेकिंग सोडा :- शरीराच्या लहानशा भागावर येणार्‍या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा फारच उपयुक्त आहे. 3 भाग सोड्यात 1 भाग पाणी एकत्र करून त्याची पेस्ट करा व खाज येणार्‍या भागावर लावा. मात्र त्वचेवर चिर गेली असल्यास किंवा जखम असल्यास हा उपाय करू नये.शरीरभर खाज सुटत असेल तर कपभर सोडा ,कोमट पाण्याच्या बाथटब मध्ये टाकून आंघोळ करा. किंवा अर्धा तास त्यात पडून रहा.

si- petroleam jelly

  • पेट्रोलियम जेली :- जर तुमची त्वचा खुपच संवेदनशील असेल तर पेट्रोलियम जेली फारच उपयुक्त आहे. पेट्रोलियम जेलीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने त्वचेतील सौम्यता राखण्यासाठी पेट्रोलियम जेली मदत करते.त्यामुळे कंड कमी करून त्वचेचे नुकसान होण्यापासून तुमचा बचाव होतो.

ही बातमी पण वाचा : टक्कल पडण्याच्या समस्येवर करा घरगुती उपचार

या समस्या टाळण्यासाठी किंवा यांचे प्रमाण कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आजमावता येतील. पण हे उपाय सर्वसाधारण कारणांच्या मुळे त्वचेवर खाज सुटली असता अवलंबिण्याचे असून, एखाद्या त्वचा रोगामुळे किंवा तत्सम काही कारणांनी खाज सुटत असेल तर घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.