७०० वर्ष जुना आहे कोल्हापूरी चप्पलेचा इतिहास! तर महाराष्ट्र आणि कर्नाटकात आले होते आमने सामने!

Kolhapuri Slipeer - Maharashtra Today

पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापुर जिल्हा तांबड्या पांढऱ्या रस्स्याप्रमाणंच आणखी एका वस्तूसाठी प्रसिद्ध आहे,. ती म्हणजे ‘कोल्हापूरी’ चप्पल. सुबक नक्षिकाम आणि अनोखा आकार असल्यामुळं चप्पलांमधला हा प्रकार इतरांपेक्षा बऱ्याच अर्थानं वेगळा ठरतो. आज कोल्हापूरात बनलेल्या चप्पल देशभरासह युरोप आणि अमेरिकेतही पाठवल्या जातात. तिथंही या चपलांना मोठी मागणी आहे. कोल्हापूरात विकसीत झालेल्या या चप्पलाच्या प्रकारवर प्राचीन इजिप्त आणि रोमचा प्रभाव अगदी स्पष्टपणे आढळतो.

स्वरुप

जगभरात प्रसिद्ध असलेली आपल्या महाराष्ट्रातली कोल्हापुरी चप्पल हे कोल्हापूर शहराच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. या चपला भारतीय व भारताबाहेरील ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या चप्पलांची ठळक वैशिष्टे म्हणजे त्यांचा सुबक आकार,नक्षीकाम आणि त्यांचा टिकाउपणा हे होय. या चपला सपाट असतात. इतर चपलांप्रमाणे त्यांच्या टाचा उंचावलेल्या नसतात. फार कमी उंचावलेल्या असतात. यांना मध्यभागी एक पट्टी असून एक अंगठा असतो. यांना चामड्याचा पृष्टभाग असून तळ लाकडाचा असतो. घसरू नये म्हणून तळावर रबराचे आच्छादन असते. यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चपलांचा आवाज या चपलांचा आवाज हा एका बारीक फळामुळे येतो.

सोदाग्र कुटुंब

कोल्हापूरी चपलेच्या विकासाच्या इतिहासात सोद्राग कुटुंबाचा मोठा वाटा आहे. कोल्हापुरी चप्पल १३ व्या शतकात उदयास आली. काप्दासी पायताण ह्या नावाने ती ओळखली जात असे. नावावरून ती कोठे बनवली गेली त्या गावची देखील माहिती मिळत असे. १९२० साली ती सोदाग्र कुटुंबाने तयार करून तिचा आकार पहिल्यापेक्षा पातळ केला आणि तीच अधिकृत कोल्हापुरी चप्पल म्हणून घोषित करण्यात आले होते. यानंतर स्वातंत्रोत्तर भारतात पुढारी लोकांची ओळख म्हणून कोल्हापुरी चप्पल ओळखले जाऊ लागले.

काळासोबत बदलले रुप

बदलत्या काळासोबत बदल्यात राहिल्याने आणि काळाची गती आणि दिशा ओळखल्याने कोल्हापूरी चप्पलेचा व्यवसाय १३ व्या शतकापासून २१ व्या शतकापर्यंत टिकून राहिला. बदलत्या वेळेसोबत कोल्हापुरी चपलेने स्वरुपही बदललं. अनेक चित्रपटांच्या नावाने कोल्हापूरी चपलेचे प्रकार प्रसिद्ध झाले. कोल्हापुरी चपलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापुरी, खास कुरुंदवाडी, खास कापशी! गावांच्या नावावरुन दिलेली. शिवाय पुडा मोरकी, पुडा पॅचिंक, पुडा अथणी,गांधीवादी अशी नावेही घेतली. अलिकडच्या बदलत्या काळात म्हणजे चित्रपटांच्या जमान्यात कोल्हापुरी चपलेने सुरक्षा, सिलसिला, सुहाग, जंजीर, नाचे मयूरी, दिल, मेरी आवाज सुनो, महाभारत अशीही नावे धारण केली असली तरी आपला मूळचा दर्जा व वैशिष्ट्ये कधीच सोडली नाहीत.

कोल्हापूरी चपलेवरुन महाराष्ट्र आणि कर्नाटक आमने सामने

८०० वर्षांहून अधिकची परंपरा असणाऱ्या कोल्हापूरी चपलेवर कर्नाटकनेही हक्क सांगितला होता. कोल्हापूर जिल्हा हा कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे. कोल्हापूरच्या सीमेला लागून असलेल्या गावातही अशा प्रकारचे चप्पल बनत असल्याने त्यावर कर्नाटकातल्या गावांनी हक्क सांगितला. कोल्हापुरातील साडेतीन हजार आणि जिल्ह्यातील वीस हजार कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. अत्यंत टिकाऊ आणि औषधी गुणधर्म असलेल्या या चपलेचे पेटंट आणि जीआय मिळवण्यासाठी गेली २० वर्षे कोल्हापूरकरांचे प्रयत्न सुरू आहेत.

कोल्हापूरीवरील जीआय आणि पेटंटसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकने (जिऑग्राफिकल इंडिकेशन) संयुक्त प्रस्ताव दाखल केला. त्यामुळे कोल्हापुरी चपलेच्या पेटंटमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. कोल्हापुरी चपलेच्या भौगोलिक स्थानानिश्चितीबाबत कर्नाटक व महाराष्ट्राचा वाद सुरू होता. मात्र, त्यानंतर दोन्ही राज्यांनी एकत्र प्रस्ताव दाखल केला. कोल्हापूरलगत असलेल्या सीमाभागातील गावांत कोल्हापूर चप्पल बनविली जातात. २०१७ साली दोन्ही राज्ये एकमेकांच्या आमने सामने आली होती. असं असतानासुद्धा २०१९ साली कोल्हापूरने बाजी मारली आणि जीआय इंडीकेशन मिळवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button