‘केजीएफ चॅप्टर 2’चे हिंदी राईट्स या निर्मात्याने घेतले 90 कोटी रुपयांना

KGF Chapter 2 - Farhan Akhtar

कन्नड भाषेतील सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार यश (Yash) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) अभिनीत ‘केजीएफ चॅप्टर 2’ (KGF Chapter 2) बाबत देशात खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘केजीएफ’ सीरीजमधील 2018 मध्ये आलेल्या पहिल्या सिनेमाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. त्यानंतर याचा दुसरा भाग तयार करण्याची घोषणा झाली आणि त्या दिवसापासून प्रेक्षक या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत. खरे तर हा सिनेमा गेल्या वर्षी रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे याचे शूटिंग होऊ शकले नव्हते. मात्र कोरोनानंतर शूटिंगला परवानगी देताच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले. संजय दत्त या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘केजीएफ चॅप्टर 2’ आता लवकरच देशभरात पाच भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. केवळ साऊथच नव्हे तर उत्तर भारतातही या सिनेमाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. ही बाब लक्षात घेऊनच याच्या हिंदी भाषेतील सिनेमाचे राईट्स एका हिंदी निर्माता अभिनेता असलेल्याने 90 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. केजीएफचा पहिला भाग अत्यंत नाममात्र किमतीला विकत घेण्यात आला होता आणि त्याने कोट्यावधी रुपये निर्मात्याला कमवून दिले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘केजीएफ चॅप्टर 2’ हिंदी साठी जी किंमत मोजण्यात आली आहे ती पहिल्या ‘केजीएफ’च्या सातपट जास्त आहे. हा साऊथचा सिनेमा असल्याने उत्तर भारतात चालणार नाही असा कयास राईट्स घेणाऱ्याचा होता. मात्र या सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावले होते आणि ज्या किमतीला राईट्स घेण्यात आले होते त्याच्या 35 पट धंदा या सिनेमाने करुन दिला होता. केजीएफचा झालेला बिझनेस आणि आता त्याची असलेली क्रेज पाहून निर्माता रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी हिंदी भाषेतील सिनेमाच्या राईट्ससाठी 90 कोटी रुपये मोजले आहेत. ‘केजीएफ चॅप्टर 2’ चा नवा टीझर लवकरच रिलीज केला जाणार आहे. या टीझरनंतर सिनेमाचा ट्रेलरही रिलीज केला जाणार आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या सिनेमात यश, संजय दत्त, श्रीनिधि शेट्टी, रवीना टंडन, अनंत नाग यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमाच्या रिलीजच डेट अजून नक्की करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER