कोरोना निगेटिव्ह असेल तरच हिमाचल सरकार कंगनाला मुंबईला जाण्याची परवानगी देईल

Kangna Ranaut

कंगना मुंबईत पोहचताच तिला ‘स्टॅम्पड’ करण्यात येईल. त्यानंतर तिला तिच्या घरी होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले जाईल. कंगनाने कोणतेही तिकीट बुक केलेले नाही. विमानतळ प्राधिकरणास अद्याप कंगनाच्या हालचालींबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. जेव्हा कंगनाच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह (Negative) येईल, तेव्हाच हिमाचल सरकार (Himachal government) कंगनाला राज्यातून बाहेर जाण्याची परवानगी देईल. कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यात अनबन सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे.

कंगनाने मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि शिवसेनेवर निशाणा साधला होता. मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनाने ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याची घोषणा केली.

दरम्यान, अशी बातमी येत आहे की, कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यावरच कंगनाला हिमाचल सरकार मुंबईला जाण्याची परवानगी देईल.

कंगनाने संजय राऊत यांना दिले आव्हान

कंगना रणौतने मुंबईस येण्यावरून शिवसेना नेता संजय राऊत यांना खुले आव्हान दिले आहे. कंगनाने ट्विट करून लिहिलं – “मला असं दिसतंय की बरेच जण मला धमकावत आहेत की मी मुंबईत येऊ नये. आता मी लवकरच मुंबईत येईन, असा निर्णय घेतला आहे. मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. जेव्हा मी मुंबईला पोहचेल, तेव्हा मी नक्कीच सर्वांसोबत वेळ शेअर करीन. एखाद्याच्या वडिलांमध्ये हिंमत असेल तर मला थांबवून दाखवा.” दुसरीकडे, कंगनाला केंद्र सरकारकडून ‘Y’ श्रेणी संरक्षण देण्यात आले आहे.

कंगना मुंबई विमानतळावर आली की सुरक्षा कर्मचारी तिच्याबरोबर असतील. कंगनासोबत एक किंवा दोन कमांडो, दोन पीएसओ आणि अन्य पोलीस असतील. सैनिकांची एकूण संख्या ११ असेल.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER