राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, दिवसभरात आढळले ६७ हजार १३ नवे रुग्ण

Corona Virus

मुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्युच्या संख्येतही भर पडतच आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. अशावेळी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली रुग्णवाढ आजही कायम आहे. आज दिवसभरात राज्यात ६७ हजार १३ करोनाबाधित वाढले असून, ५६८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.५३ टक्के एवढा आहे.

याशिवाय आज ६२ हजार २९८ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३३,३०,७४७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४८,९५,९८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४०,९४,८४० (१६.४५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,७१,९१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,०१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,९९,८५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button