तुरुंगांत कोरोना रुग्ण वाढल्याची हायकोर्टाकडून स्वत:हून दखल

Coronavirus - Prison - Bombay High Court
  • एका महिन्यात १५० कैद्यांना विषाणू संसर्ग

मुंबई : राज्यातील कारागृहांमध्ये कोरोना (Corona) रुग्णांट्या संख्येत गेल्या महिनाभरात झालेल्या लक्षणीय वाढीची उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या रूपाने स्वत:हून दखल घेतली असून सरकारला याविषयीची सर्व माहिती सादर करण्यास सांगितले आहे.

खास करून ‘हिदुस्तान टाइम्स’ आणि ‘फ्री प्रेस जर्नल’ या दोन इंग्रजी दैनिकांमध्ये १६ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन न्या. नितीन जामदार  व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने हा विषय जनहित याचिका म्हणून सुनावणीसाठी हाती घेण्याचे ठरविले.

राज्य सरकारचे कगृह व महसूल हे दोन विभाग, पोलीस महासंचालक व कारागृह महासंचालक यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. राज्यभरातील तुरुंगांमध्ये कैदी आणि कर्मचाºयांना कोरोना विषाणूची लागण होण्याची ताजी स्थिती काय आहे? महामारीचा प्रसार रोखण्यासाठी सरकार कोँते उपाय योजणार आहे आणि तुरुंगांमधील गर्दी कमी करण्यासाठी काय करता येऊ शकेल यासंबंधीची सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश प्रतिवादींना देऊन या जनहित याचिकेवर मंगळवार २० एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आली.

गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाची साथ सर्वप्रथम सुरु झाल्यानंतरही तुरुंगातील कैद्यांना त्याचा  प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कैद्यांना हंगामी पॅरॉल व हंगामी जामिनावर सोडून तुरुंगांमधील गर्दी कमी करण्यााचे उपाय योजले गेले होते.

आता कोरोनाच्या साथीची दुसरी लाट आल्यावर त्याची लागण तुरुंगांमध्येही होऊन गेल्या महिनाभरात तुरंगातील कोरोनाबाधित कैद्यांची संख्या १४ एप्रिल रोजी  ४२ वरून सुमारे २०० वर पोहोचली होती. याखेरीज सहा तुरुंग कर्मचाºयांनाही कोरानाची लागण झाली होती.

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार कोरोनाबाधित कैद्यांची तुरुंगनिहाय संख्या अशी होती: येरवडा ३१ कैदी व ११ कर्मचारी, कोल्हापूर २९ कैदी, ठाणे २६ कैदी, आॅर्थर रोड, मुंबई १८, नाशिक १५ आणि नागपूर १०.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button