प्रिन्स हॅरी यांच्याशी विवाहाचे वकिलाचे दिवास्वप्न भंगले!

Prince Harry-Haryana High Court

परिकथेला साजेशी याचिका हायकोर्टाने फेटाळली

चंदिगड :- ब्रिटनच्या राजघराण्यातील एक राजपुत्र प्रिन्स हॅरी लग्नाचे आश्वासन देऊन टाळाटाळ करत असल्याने त्यांनी अटक करून आपल्याशी लग्न करायला त्यांना भाग पाडावे, अशी मागणी करणारी परिकथेत शोभावी अशी एक याचिका पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (Haryana High Court) फेटाळली आहे.

पलविंदर सिँग नावाच्या एका महिला वकिलाने ही याचिका केली होती. ही याचिका म्हणजे दिवास्वप्न पाहणारीच्या स्वप्नरंजनाखेरीज दुसरे काही  नाही, असे मत नोंदवून न्या. अरविंद सिंग संगवान यांनी ही याचिका फेटाळली.

ब्रिटनचे युवराज प्रिन्स चार्ल्स यांचे चिरंजीव प्रिन्स हॅरी यांनी आपल्याशी लग्न करण्याचे आश्वासन समाजमाध्यमांतून आपल्याला अनेक वेळा दिले. पण आता ते लग्न करण्याची टाळाटाळ करत आहेत. प्रिन्स हॅरी आणि आपले लग्न ठरले आहे, असे आपण त्यांचे वडील प्रिन्स चार्ल्स यांनाही कळविले आहे, असे या याचिकाकर्तीचे म्हणणे होते. याचा पुरावा म्हणून या महिला वकिलाने ती आणि प्रिन्स हॅरी यांच्यात समाजमाध्यमांतून परस्परांना पाठविलेल्या संदेशांच्या ‘प्रिन्टआऊट्स’ही याचिकेला जोडल्या होत्या.

या महिला वकिलाने न्यायालयापुढे स्वत:ची बाजू स्वत:च मांडली. खरे तर कोरोनामुळे न्यायालयापुढे सध्या ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ माध्यमातून प्रकरणांवर सुनावणी केली जाते. परंतु या याचिकाकर्तीने विनंती केल्याने न्या. सिंग यांनी तिच्या याचिकेवर प्रत्यक्ष न्यायालयात घेतली. ज्या प्रिन्स हॅरी जेथे राहतात त्या ब्रिटनला तुम्ही स्वत: कधी गेला आहात का?, असे न्यायमूर्तींनी विचारता या स्वप्नाळू याचिकाकर्तीने नकारार्थी उत्तर दिले.

समाजमाध्यमांतील कोण्या एका प्रिन्स हॅरीशी झालेले चॅटिंग खरे मानून त्याच्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहणाºया या याचिकाकतीर्विषयी सहानुभूती व्यक्त करण्याखेरीज न्यायालय दुसरे काही करू शकत  नाही, असे नमूद करून न्या. सिंग यांनी निकालपत्रात लिहिले की, फेसबूक. टष्ट्वीटर यासारख्या समाजमाध्यमांवर सेलिब्रिटी लोकांच्या नावाचे बनावट १आयडी’ तयार केली जातात हे सर्वज्ञात वास्तव आहे. त्यामुळे न्यायालय अशा चॅटिंगच्या खरेपणावर विश्वास ठेवू शकत नाही. कदाचित याचिकाकर्तीला भेटलेला हा प्रिन्स हॅरी पंजाबमधील एखाद्या खेड्यातील सायबर कॅफेमध्ये नवे सावज शोधत बसलेलाही असू शकेल!

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button