चित्रपटात येण्यापूर्वी म्यूझिक व्हीडियोमध्ये काम केले होते या नायिकांनी

Heronies

एक जमाना होता जेव्हा जास्तीत जास्त म्यूझिक व्हीडियो तयार केले जात असत. या म्यूझिक व्हीडियोंना प्रचंड मागणी असायची. त्यामुळे त्याच्या मेकिंगवरही बऱ्यापैकी खर्च केला जात असे. जेवढा चांगला व्हीडियो तेवढे चांगले पैसे कॅसेट कंपन्या देत असत. त्यामुळे अनेक गायकांनी खूपच चांगले पाहावेसे वाटणारे म्यूझिक व्हीडियो बनवले होते. विशेष म्हणजे या जुन्या म्यूझिक व्हीडियोमध्ये अशा नायिकांनी काम केले ज्या त्यावेळी चित्रपटसृष्टीत नायिका बनल्या नव्हत्या. मात्र आज त्या मोठ्या नायिका झाल्या आहेत. म्यूझिक व्हीडियोत चमकलेल्या अशाच काही नायिकांची आज आम्ही तुम्हाला ओळख करून देत आहोत.

दीपिका पदुकोन (Deepika Padukone) आज बॉलिवुडमधील मोठी स्टार असून ती आता निर्मात्रीही झाली आहे. पति रणवीरच्या 83 चित्रपटाची ती निर्मात्री असून चित्रपटात ती कामही करीत आहे. फार कमी जणांना ठाऊक असेल की दीपिकाने म्यूझिक व्हीडियोमध्ये काम केले होते. दीपिकाने मॉडेलिंगला सुरुवात केली होती आणि चित्रपटसृष्टीत येण्याचा प्रयत्न करीत होती त्या दरम्यान तिने एका म्यूझिक व्हिडियोमध्ये काम केले होते. गायक हिमेश रेशमियाने नाम है तेरा नावाने एक म्यूझिक व्हिडियो तयार केला होता. यात सफेद आणि लाल रंगाच्या कपड्यांमध्ये दीपिकाने काम केले होते. त्यानंतर मात्र दीपिका पुन्हा कधी म्यूझिक व्हिडियोत दिसली नाही.

मलाइका अरोरा (Malaika Arora) आपल्या नृत्यासाठी लोकप्रिय आहे. चित्रपटात तिने नृत्य केलेली अनेक गाणी आजही प्रेक्षकांना आठवतात. मात्र चित्रपटात येण्यापूर्वी मलाइकाने अनेक म्यूझिक व्हिडियोमध्ये काम केले होते. परंतु तिला लोकप्रियता मिळाली होती बाली सागूच्या गुड़ नाल इश्क मीठा गाण्यामुळे. या गाण्याच्या म्यूझिक व्हिडियोत मलाइका खूपच सुंदर दिसली होती.

बॉलिवुडमध्ये आपल्या बंगाली सावळ्या सुंदरतेने नाव कमवणारी बिपाशा बसूही (Bipasha Basuhi) सुरुवातीला म्यूझिक व्हिडियोत चमकली होती. सोनू निगम ने अनेक म्यूझिक व्हिडियो तयार केले होते. त्यापैकी तू कब ये जानेगी गाणे खूप लोकप्रिय झाले होते. या गाण्यात बिपाशा बसुने काम केले होते.

विद्या बालन (Vidya Balan) आज बॉलिवुडमध्ये एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून स्वतःचे नाव कमावून आहे. तिच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. अनेक नायकांना जे जमत नाही ते करीत विद्या स्वतःच्या खांद्यावर अख्खा चित्रपट घेऊन जाते.  मात्र अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी विद्या बालनने म्यूझिक व्हिडियोत काम केले होते. यूफोरिया बँड तेव्हा प्रचंड लोकप्रिय होता. या बँडच्या एका म्यूझिक अलबममध्ये  विद्या बालन पलाश सेनसोबत दिसली होती. हे गाणे होते कभी आना तू मेरी गली में.

इरफान खानसोबत लंचबॉक्स चित्रपटात अत्यंत वेगळी भूमिका साकारून सगळ्यांचे लक्ष निमरत कौरने वेधले होते. त्यानंतर अक्षयकुमार सोबत एयरलिफ्ट चित्रपटातही निमरतने चांगली भूमिका साकारली होती. मात्र निमरतनेही म्यूझिक व्हिडियोतूनच आपली कारकिर्द सुरु केली होती. श्रेया घोषाल आणि कुमार सानू यांच्या ये क्या हुआ या म्यूझिक व्हिडियोत निमरतने काम केले होते. या गाण्यात ती खूप सेक्सी दिसली होती.

आयशा टकियानेही (Ayesha Takiya) चित्रपटात येण्यापूर्वी म्यूझिक व्हिडियोत काम केले होते. तिचा म्यूझिक व्हिडियो प्रचंड लोकप्रिय झाला होता. दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकने मेरी चूनर उड़-उड़ जाए गाणे म्हटले होते. या गाण्याच्या व्हिडियोत आयशा टकियाने काम केले होते. या यादीत असेही एक नाव आहे जे तुम्ही वाचाल तर चकित व्हाल. सध्या केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृति इरानी यांनीही मालिकेत काम करण्यापूर्वी म्यूझिक व्हिडियोत काम केले होते. मिका सिंह ने ढिंचॅक भांगडा नावाने एक म्यूझिक अलबम तयार केला होता. या म्यूझिक व्हिडियोत स्मृति इरानी यांनी काम केले होते. त्यानंतर स्मृती इरानी यांनी एकता कपूरच्या क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेत काम केले आणि प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER