नायिकांनी अनोख्या अवतारात साजरा केला हॅलोविन डे

The heroines celebrated Halloween Day in a unique incarnation

भारतीय विशेषतः बॉलिवूड कलाकार भारतात राहात असले तरी त्यांचे संपूर्ण वागणे हे पाश्चात्य देशातील नागरिकांप्रमाणे असते. पाश्चात्यांचे सणही मोठ्या प्रमाणावर बॉलिवूड कलाकार (Heroines Celebrity) साजरे करतात. बॉलिवूड कलाकारांना फॉलो करीत असलेले त्यांचे प्रशंसकही मग ते सण साजरे करू लागतात. यातूनच विविध डे साजरे करण्याचे फॅड भारतातील तरुणाईमध्ये आले आहे. अशा अनेक डेपैकीच एक डे आहे हॅलोविन डे (Halloween Day). हॅलोविन डेला भूताखेताचे कपडे घालून, त्यांच्यासारखा मास्क घालून पार्टी केली जाते. हे पोशाख अत्यंत चित्रविचित्र असतात. लहान मुलांनी असे कपडे बघितले तर ते नक्कीच घाबरतील. पण बॉलिवू़डवाल्यांनी त्यांच्या मुलांनाही या डे साठी तयार केलेले आहे. आणि हे फॅड सामान्य जनतेतील लहान मुलांमध्येही पसरले आहे.

प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोबरला साजऱ्या केला जातो. प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), प्रीति झिंटा (Priti Zinta) यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी शनिवारी हॅलोविन डे साजरा केला. या कलाकारांनी त्यांचे चित्र विचित्र फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर शे्र केले आहेत. कोरोनाकाळ असल्याने बहुतेक कलाकार अजूनही घरीच आहेत. त्यामुळे घरातच या कलाकारांनी मोठ्या प्रमाणावर हँलोविन डे साजरा केला.

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि शिल्पा शेट्टीने सोशल मीडिया फिल्टरचा वापर करीत व्हिडियो तयार केले तर सोनम कपूर आणि प्रीति झिंटाने वेगळ्या प्रकारचे फोटो शेअर केले. प्रियांका चोप्राने एक व्हीडियो शेअर करीत हँलोविन साजरा कसा केला ते दाखवले. शिल्पा शेट्टीनेही फिल्टरचा वापर करून व्हिडियो पाहाणाऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. यासोबतच तिने हॅलोविनच्या शुभेच्छाही तिच्या प्रशंसकांना दिल्या.सोनम कपूरने (Sonam Kapoor) हॅलोविन निमित्ताने हॉलिवुडची प्रख्यात अभिनेत्री मर्लिन मन्रोप्रमाणे गेटअप घेऊन फोटोशूट केले. सोनमने सोशल मीडियावर तिचा हा वेगळा फोटो टाकत हँलोविनच्या शुभेच्छा दिल्या. सोनमने पोस्टमध्ये म्हटले आहे, जर मी सगळ्या नियमांचे पालन केले असते तर कुठेही पोहोचू शकली नसती.

तर प्रिती झिंटाने तिच्या कभी अलविदा ना कहना चित्रपटातील एक फोटो शेअर करीत हँलोविनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये प्रीति झिंटाने तोंडाला मेकअप फाऊंडेशन लावले असून शाहरुख खान तिच्या पाठीमागे उभा असल्याचे दिसत आहे. या फोटोला प्रीतिन कॅप्शन दिली असून तिने त्यात म्हटले आहे, या हॅलोविनला तुमच्या चेहऱ्यावर जो मास्क आहे तो तुमच्या जीवनात जो पुरुष आहे त्याला घाबरवण्यासाठी पुरेसा आहे. कोरोना व्हायरससाठी नाही. त्यामुळे निवड करताना योग्य निवड करा असा सल्लाही तिने दिला आहे.

इरा खान, सोहा अली खान आणि नेहा धूपिया यांनीही हॅलोविन डे साजरा केला असून त्यांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER