पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोषण आहाराचा प्रचार करणार ही नायिका

manushi chhillar with narendra modi

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात संपूर्ण सप्टेंबर महिना देशभरात पोषण महिना (Nutritious Month) म्हणून साजरा केला जाईल, असे सांगितले होते. पोषण  (न्यूट्रिशन) (nutritious) याचा अर्थ असा नाही की आपण काय, किती, किती वेळा खातो. पोषण आहाराचा खरा अर्थ आपल्या शरीराला आवश्यक पोषक आहार किती मिळत आहे हा असतो. आपल्यात एक म्हण आहे- यथा अन्नम तथा मन्नम, म्हणजेच जसे आपले अन्न असते, त्याप्रमाणे आपला मानसिक आणि बौद्धिक विकास होतो.

त्यामुळे पोषक आहाराला खूप महत्त्व असते. पंतप्रधानांच्या या मोहिमेचा प्रचार करण्यासाठी अभिनेत्री मानुषी छिल्लर  (Manushi Chillar) पुढे सरसावली आहे. मानुषी आहाराबाबत प्रचंड जागरूक असून ती  फिगर मेंटेन (Maintain figure) करण्याकडेही लक्ष देते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर महिना पोषण आहार महिना म्हणून साजरा करण्याचे म्हटले. यासाठी मानुषी छिल्लर सोशल मीडियावर एक मोहीम सुरू  करणार आहे. या मोहिमेअंतर्गत ती भारतीयांना आहार आणि व्यायामाबाबत माहिती देणार आहे. लोकांनी काय, कसे आणि किती खाल्ले तर त्यांच्या शरीराला योग्य पोषण आहार मिळेल हे मानुषी सोदाहरण सांगणार आहे.

ही बातमी पण वाचा : जेव्हा राजीव गांधींना मेहमूद यांनी दिली चित्रपटाची ऑफर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER