बिकिनीला नो म्हणणाऱ्या नायिका

The heroine who says no to bikinis

बॉलिवुडमध्ये नायिका म्हणजे अंग प्रदर्शन करणारी शोभेची बाहुली. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक नायिकांकडून मनसोक्तपणे अंग प्रदर्शन करवून घेतात. मग यात कधी तिला शिफॉन साडीमध्ये पावसात भिजलेली दाखवतात तर कधी समुद्रात आणि स्वीमिंग पूलमध्ये स्वीमिंग करताना दाखवतात. नायिकेने नखरे करू नयेत म्हणून असे दृश्य कथानकाचा भाग असल्याचे दाखवतात आणि नायिकेला बिकिनी घालायला भाग पडतात. असे असले तरी अशा अनेक नायिका आहेत ज्यांनी नो बिकिनी म्हणत बिकीनी घालण्यास नकार दिला आहे. एवढेच नव्हे तर पूर्वी चित्रपटात बिनधास्त बिकीने घातलेल्या नायिकांनीही आता नो बिकीनी म्हटले आहे.

Vani Kapoorबेफिक्रे आणि वॉर चित्रपटात बिनधास्त बिकीनी घालणाऱ्या वाणी कपूरने नो बिकीनी म्हणत एका मोठ्या उत्पादनाच्या जाहिरातीला नकार दिला आहे. यामुळे तिचे कोट्यावधींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका मोठ्या कंपनीने वाणीला त्यांच्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी साईन करण्याचे ठरवले. दिग्दर्शकाने जाहिरातीत बिकीनी घालावी लागेल असे म्हटल्यानंतर वाणी कपूरने चक्क नकार दिला. वाणीच्या या उत्तराने सगळेच अवाक झाले. चित्रपटासाठी बिनधास्त बिकिनी घालणाऱ्या वाणीने आता आपली इमेज बदलण्याचा निर्णय घेतला असावा त्यामुळेच तिने नो बिकीनी म्हटले असेल.

Kareena Kapoorकरीना कपूरनेही यापुढे कधीही बिकीनी घालणार नाही असे म्हटले आहे. खरे तर करीनाने अनेक चित्रपटांमध्ये बिकीनी घातली असून अंग प्रदर्शनही केले आहे. करीनाची बहिण करिश्मा आणि आई बबितानेही चित्रपटात बिकीनी घातली होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून करीनाने चित्रपटात बिकिनी न घालण्याचा निर्णय घेतला आहे. कथेची डिमांड असेल तरीही मी बिकीनी घालणार नाही असे तिने स्पष्ट केले आहे.

एकीकडे बिकीन घालणाऱ्या नायिकांनी बिकीनी न घालण्याचा निर्णय घेतला असला तरी बॉलिवुडमध्ये अशाही नायिका आहेत ज्यांनी कधीही बिकिनी न घालण्याचा निर्णय घेतला असून त्यावर Sonakshi Senhaकायम आहेत. यात सोनाक्षी सिन्हाचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अर्थात तिची शरीरयष्टी पाहाता ती बिकिनीत चांगली दिसणार नाही हे तिला चांगले ठाऊक असल्यानेच तिना असा निर्णय घेतला असावा.

या यादीत दुसरी नायिका आहे काजल अग्रवाल. सिंघम चित्रपटामुळे हिंदीत लोकप्रिय झालेल्या आणि दक्षिण भारतीय चित्रपटात सुपरस्टार असलेल्या काजलने चित्रपटात कधीही बिकीनीवर दृश्य  न देण्याचा निर्णय घेतला आहे. काजलचे म्हणणे आहे, माझ्या कुटुंबियांसमवेत चित्रपट बघताना त्यांना संकोच वाटेल अशी दृश्ये मी कधीही करणार नाही. ग्लॅमरचा अर्थ फक्त बिकीनी घालणेच असा नाही तर चांगल्या अभिनयातूनही तुम्ही ग्लॅमरस दिसू शकता.

काजलप्रमाणेच दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत लोकप्रिय असलेल्या आणि हिंदीतही यश मिळवलेल्या तमन्ना भाटियानेही बिकीनी न घालण्याचा निर्णय घेतला आहे. बाहुबली चित्रपटामुळे तमन्ना प्रचंड लोकप्रिय आहे. साजिद खानने हमशकलसाठी तमन्नाला बिकीनी घालण्यास सांगितले तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिला होता.  बिकीनी न घालण्याचा निर्णय मी घेतला असून मला ते आवडत नाही. आजपर्यंत तरी मी माझ्या या निर्णयावर ठाम असून अशी अनेक दृश्ये नाकारल्याचे तमन्नाने सांगितले होते.

प्रियांका चोप्राची बहिण परिणीती चोप्रानेही चित्रपटात बिकिनी न घालण्याचा निर्णय घेतला आहे. सोनाक्षीप्रमाणेच परिणीतीची शरीरयष्टीही बिकीनीसाठी योग्य नाही आणि ही बाब परिणीतीला चांगलीच ठाऊक आहे. बिकीनीत बेढब दिसण्यापेक्षा बिकीनी न घातलेलीच चांगली हे तिला जाणवले आहे. त्यामुळेच कदाचित तिने असा निर्णय घेतला असावा. बिकीनीची दृश्ये असलेले अनेक चित्रपट परिणीतीने नाकारल्याचे सांगितले जाते.

बिनधास्त भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि सध्या शिवसेनेशी पंगा घेऊन संपूर्ण देशभर चर्चेत असलेल्या कंगनानेही टू पीस बिकिनी घालण्यास नकार दिला होता. डेव्हिड धवनच्या रास्कल्समध्ये कंगनाला टू पीस बिकीनी घालायची होती. अजय देवगन, संजय दत्त, डेव्हिड धवन यांनी कंगनाला खूप समजावले पण कंगनाने ते दृश्य करण्यास नकार दिला होता.

चित्रपट बिनधास्त होत असताना नायिकांचे हे बदललेले रूप त्यांच्या करिअरच्या आड नक्कीच येईल. याचे कारण अनेक नव्या मुली सध्या नायिका बनण्यासाठी तयार असून त्या बिकीनी घालून दृश्य देण्यासही तयार आहेत. त्यामुळे बिकीनी न घालणाऱ्या नायिकांची सद्दी संपण्याच्या मार्गावर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER