एकाच नायकाच्या प्रेमिका आणि आई झालेल्या नायिका

Waheeda Rehman - Amitabh Bachchan

बॉलिवुडमध्ये (Bollywood) काम करत राहाण्यासाठी कलाकारांना अनेकदा वेगळ्या भूमिका साकाराव्या लागतात. नायकाने पन्नाशी पार केली तरी तो नायकच राहातो. बाप-बेटा अशी दुहेरी भूमिका असेल तरच नायक बापाच्या भूमिकेत दिसतो. त्यातच कधी कधी तर बापाला अगोदरच मारलेही जाते, मात्र असे चित्रपट मोठ्या प्रमाणावर तयार झालेले दिसत नाहीत. नायकाची अशी परंपरा असली तरी नायिकांना मात्र ज्या नायकाबरोबर प्रेम प्रसंग रंगवलेले असतात कधी कधी त्याची आई म्हणूनही भूमिका साकारावी लागते. नायकाची दुहेरी भूमिका असेल तर त्याच्या मुलाची आई म्हणजे आई अशी माहिती देण्याचा या लेखाचा उद्दश्य नाही. तर एका चित्रपटात नायकाची प्रेमिका झालेल्या नायिकेने दुसऱ्या चित्रपटात त्याच्या आईची भूमिका साकारलेल्या नायिकांची माहिती देणे आहे. मात्र अशा नायिका हाताच्या बोटावर मोजता येण्यासारख्या आहेत. त्यातही विशेष म्हणजे या नायिकांनी अमिताभ बच्चनच्याच (Amitabh Bachchan) प्रेमिका आणि आईची भूमिका साकारली आहे.

वहिदा रहमान (Waheeda Rehman) जेव्हा कारकिर्दीच्या ऐन बहरात होती तेव्हा अमिताभ बच्चन नुकताच संघर्ष करू लागला होता. अमिताभ बच्चन वहिदा रहमानचा फॅनही होता. निर्मात्यांनी वहिदा रहमान आणि अमिताभ बच्चनची जोडी दोन चित्रपटांमध्ये एकत्र आणली होती. 1976 मध्ये आलेल्या “अदालत’ चित्रपटात सर्वप्रथम हे दोघे एकत्र आले होते. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. हा चित्रपट हिटही झाला होता. त्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे 1978 मध्ये यश चोप्रा यांनी ‘त्रिशुल’ चित्रपटात वहिदा रहमानला चक्क अमिताभची आई बनवले. विशेष म्हणजे वहीदा रहमानही ही भूमिका साकारण्यास तयार झाली होती. प्रकाश मेहरा यांनीही 1982 मध्ये ‘नमक हलाल’ चित्रपटात वहिदा रहमानला अमिताभची आई बनवले होते. 1983 मध्ये मनमोहन देसाई यांनीही ‘कुली’ चित्रपटात वहिदा रहमानला अमिताभची आई म्हणून पडद्यावर आणले होेते. करण जोहरने मल्टीस्टारर कभी खुशी कभी गम चित्रपटातही वहिदा रहमानला अमिताभच्या आईची भूमिका साकारण्यास साईन केले होते. परंतु वहिदाच्या पतीचे कमलचे निधन झाल्याने वहिदाने हा चित्रपट सोडला होता. त्यानंतर अचला सचदेवने अमिताभच्या आईची भूमिका साकारली होती.

Pin on Rakhee Gulzarवहिदासोबतच राखीनेही अमिताभची नायिका आणि प्रेमिका अशा भूमिका साकारल्या आहेत. राखी आणि अमिताभने जवळ जवळ 11 चित्रपटात एकत्र काम केले आहे. या दोघांची सर्वप्रथम जोडी बनवली यश चोप्रा यांनी. 1976 मध्ये यांनी कभी कभी चित्रपटात या दोघांना एकत्र आणले. असे सांगितले जाते की अमिताभ राखीला देवी संबोधत असे त्यामुळे राखीबरोबर प्रेम प्रसंग कसे करायचे असा प्रश्न मनात आल्याने अमिताभने यश चोप्रांना नकार दिला होता. राखीला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिने अमिताभला सांगितले की, आपण कलाकार आहोत आणि पडद्यावर भूमिका साकारायची असते त्यामुळे त्यात वावगे वाटून घेण्यासारखे काही नाही. यश चोप्रांनी अमिताभला समजावून सांगितले आणि ही जोडी जमली. त्यानंतर या जोडीने कस्मे वादे, काला पत्थर, त्रिशुल, बरसात की एक रात, मुकद्दर का सिकंदरमध्ये नायक-नायिकेच्या रुपात काम केले. 1982 मध्येच रमेश सिप्पी यांनी आपल्या बहुचर्चित शक्ती चित्रपटात राखीला चक्क अमिताभच्या आईच्या भूमिकेत पडद्यावर आणले, दिलीपकुमार आणि अमिताभ अभिनीत या चित्रपटात राखीने दिलीपकुमारच्या पत्नीची आणि अमिताभच्या आईची भूमिका साकारली होती.

शर्मिला टागोरनेही अमिताभसोबत प्रेमिका आणि आई अशा दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. 1975 मध्ये आलेल्या ‘फरार’ चित्रपटात शर्मिला टागोर आणि अमिताभ बच्चन नायक-नायिका होते. त्यानंतर 1978 मध्ये बेशरम चित्रपटातही या दोघांनी नायक-नायिकेची भूमिका साकारली होती. मात्र 1982 मध्ये आलेल्या ‘देशप्रेमी’ चित्रपटात शर्मिला टागोरने अमिताभच्या आईचीही भूमिका साकारली होती. मात्र यात अमिताभची दुहेरी भूमिका होती. महेश मांजरेकच्या विरुद्ध चित्रपटात पुन्हा एकदा अमिताभ आणि शर्मिला टागोर यांनी पति-पत्नीची भूमिका साकारली होती.

बाहुबली चित्रपटाने लोकप्रिय झालेल्या अनुष्का शर्मानेही बाहुबली चित्रपटात प्रभासच्या प्रेयसीची आणि आईची अशी दुहेरी भूमिका साकारली होती. तर नरगिसने मदर इंडियामध्ये सुनील दत्तच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर या दोघांनी लग्न केले. त्यानंतर नरगिसने सुनील दत्तच्या यादें चित्रपटात त्याच्या नायिकेची भूमिका साकारली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER