नायिकेचा खुलासा, काही निर्मात्यांनी त्यांच्यासोबत झोपण्यास सांगितले होते

Vidhu Vinod Chopra - Nargis Fakhri - Subhash Ghai

बॉलिवूडमध्ये (Bollywood) काम मिळवण्यासाठी नायिकांना काय काय करावे लागते हे अनेक नायिकांनी वेळोवेळी सांगितले आहे. बॉलिवूड आणि ड्रग्सचे संबंध समोर आणणाऱ्या कंगनानेही (Kangana Ranaut) बॉलिवूडमधील लैंगिक शोषणाबद्दल वक्तव्य केले होते. बॉलिवूडमध्ये लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप आता आणखी एका नायिकेने केला आहे. ही नायिका आहे प्रख्यात अभिनेत्री नरगिस फाखरी (Nargis Fakhri). रणबीर कपूरच्या रॉकस्टारमधून नरगिसने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता त्यामुळे नरगिस लगेचच यशस्वी अभिनेत्री ठरली होती. याच नरगिसने बॉलिवूडमध्ये आलेले अनुभव पोर्नस्टार असलेल्या ब्रिटनी नावाच्या एका विदेशी अभिनेत्रीच्या टॉक शोमध्ये शेअर केले आहेत. हा व्हीडियो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे,

या मुलाखतीत आपल्या सुरुवातीच्या दिवसाबाबत माहिती देताना नरगिस फाखरी म्हणते, मला प्रसिद्धी मिळवायची नव्हती तर माझे कुटुंब चालवण्यासाठी मला पैशांची आवश्यकता असल्याने मी मॉडेलिंगनंतर चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला होता. या दरम्यान मी अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांना भेटले. त्यापैकी काही जणांनी तर मला त्यांच्यासोबत झोपण्याची ऑफर दिली. याबाबत मी ऐकून होते परंतु माझ्यासोबतही असे होईल असे मला वाटले नव्हते. माझ्या एका मॉडेल मैत्रीणीने सांगितले, असे केल्याशिवाय तुला काम मिळणारच नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याने अनेक मोठे चित्रपट माझ्या हातातून गेले. मला त्याचे दुःख नाही उलट मी कोणासमोर झुकले नाही. ही शिकवण मला आईकडून मिळाली याचा अभिमान वाटतो असेही नरगिसने या मुलाखतीत म्हटले आहे.

विधु विनोद चोप्राने (Vidhu Vinod Chopra) केले होते एका दृश्यात काम

बॉलिवुडमध्ये अनेक यशस्वी दिग्दर्शक आहेत. यापैकी अनेक दिग्दर्शक आपल्या चित्रपटात छोटीशी का होईना भूमिका करताना दिसतात. सुभाष घई (Subhash Ghai) तर आपल्या प्रत्येक चित्रपटात एक कॅमियो करतातच करतात. मुळात हे यशस्वी दिग्दर्शक बॉलिवूडमध्ये अभिनेता होण्यासाठीच आलेले असतात. काही वर्ष प्रयत्न केल्यानंतर त्यांना आपली खरी ओळख पटते आणि ते दिग्दर्शनात उतरतात आणि केवळ उतरत नाहीत तर तेथे यशही मिळवतात. याच यादीमध्ये विधु विनोद चोप्राचेही नाव घेता येईल, विधुने परिंदा, मिशन कश्मीर, मुन्नाभाईची दोन चित्रपटांची मालिका, परिणीता, 3 इडियट असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. याच विधुने आपल्या स्वतःच्या चित्रपटात कधीही काम केले नाही परंतु त्याने एफटीआयआयच्या शेवटच्या वर्षात मर्डर अॅट मंकी हिल नावाच्या लघुपटात काम करून आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही त्यानेच केले होते. विशेष म्हणजे या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर विधुने जाने भी दो यारों चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला होता. पण यात विधु कुठे होता ते तुमच्या लक्षात येणार नाही. जाऊ द्या विचार करू नका. आम्ही सांगतो.

जाने भी दो यारो या चित्रपटात महाभारतातील वस्त्रहरणाचे एक दृश्य तुम्हाला आठवत असेलच जे प्रचंड लोकप्रिय झाले होते. यात आदिल रजा भीम झाला होता, जसपाल संधू धृतराष्ट आणि विधु विनोद चोप्रा दुशासनाच्या भूमिकेत दिसला होता. फक्त काही अक्षरशः काही मिनिटांचीच ही भूमिका होती पण विधुने ती साकारली होती. त्यानंतर मात्र त्याने कधी अभिनय करण्याचा प्रयत्न केला नाही.

सुभाष घई आपल्या प्रत्येक चित्रपटात काही सेकंदांसाठी दर्शन देतो. सुभाष घई जेव्हा मुंबईला आला तेव्हा त्याने नायक व्हायचे ठरवले होते. एका टॅलेंट स्पर्धेत त्याने भाग घेतला होता. त्याच्यासोबत राजेश खन्ना आणि धीरज कुमारही होते. या स्पर्धेनंतर राजेश खन्नाला लगेचच चित्रपटात संधी मिळाली तर सुभाष घईला एक वर्षानंतर. तकदीर, आराधनामध्ये छोट्या भूमिका केल्यानंतर सुभाष घईला 1976 मध्ये कालीचरणने दिग्दर्शनाची संधी मिळाली. चित्रपट हिट झाल्यानंतर मात्र सुभाष घईने अभिनयापेक्षा दिग्दर्शनाकडेच जास्त लक्ष दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER