अडचणींवर मात करीत यश मिळवलेल्या महिलांची गाथा सांगणार ‘पृथ्वीराज’ची नायिका

Akshay Kumar - Manushi Chhillar - Prithviraj

8 मार्चला जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळावे म्हणून महिलांनी प्रचंड संघर्ष केला. आज जवळ-जवळ सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर दिसतात मग ते युद्धकाळात विमान चालवणे असो वा सामान्य लोकांच्या रोजच्या जगण्यासाठी असलेले वाहतुकीचे साधन रेल्वे, ऑटो रिक्षा वा टॅक्सी असो. राजकारणतही महिलांनी त्यांचा ठसा उमटवला असला तरी 35 टक्के आरक्षण असातानाही तेवढ्या प्रमाणात महिला राजकारणात दिसत नाही. याशिवाय जगात अशाही काही महिला आहेत ज्या काही व्याधींनी त्रस्त आहेत, तर घरगुती हिंसाचाराच्या शिकार झाल्या, मात्र अशा संकटात स्वतःला ‘बिचाऱ्या’ न समजता त्यांनी असे काही काम केले की, सगळ्यांनाच तोंडात बोट घालावयास लावले. अशाच काही महिलांची गाथा माजी मिस वर्ल्ड आणि अक्षयकुमार (Akshay Kumar) सोबत ‘पृथ्वीराज’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर पाऊल टाकणारी मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) प्रेक्षकांसमोर आणणार आहे.

प्रियांका चोप्रानंतर (Priyanka Chopra) 17 वर्षांनी मानुषी छिल्लरच्या रुपाने एक भारतीय मुलगी पुन्हा मिस वर्ल्ड झाली. मिस वर्ल्ड झाल्यानंतर सिनेमात येणे क्रमप्राप्तच आहे. त्यानुसार मानुषी यावर्षी यशराजच्या बहुचर्चित आणि भव्य अशा ऐतिहासिक ‘पृथ्वीराज’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. मानुषीने ‘मेक अ मूव्ह’ नावाने एक मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत अशा यशस्वी महिलांची गाथा प्रेक्षकांसमोर आणली जाणार आहे ज्यांनी सामाजिक आणि मानसिक त्रासावर मात करून विजय प्राप्त केला आणि दुसऱ्यांना प्रेरणा दिली. या मोहिमेसाठी मानुषीने देशातील दोन लोकप्रिय महिला खेळांडूंनाही सोबत घेतलेले आहे. या महिला आहेत प्रख्यात स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकल आणि बॉक्सिंगमध्ये कमाल दाखवत असलेली निखत झरीन. या मोहिमेअंतर्गत केवळ भारतातीलच नव्ह तर जगभरातील अशा महिलांच्या कथा समोर आणल्या जाणार आहेत. मानुषी सांगते, “या मोहिमेशी जोडले जाताना मला खूपच आनंद होत आहे. या मोहिमेचा उद्देश्यच महिलांना त्यांच्या यशापर्यंत जाण्यासाठी प्रेरित करण्याचा आहे. या मोहिमेमुळे महिला जास्त आत्मविश्वासी होतील. त्या स्वतःवर विश्वास ठेऊ लागतील आणि त्या महत्वाकांक्षीही होतील. मुली, महिलांना अनेकदा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अशा मानसिक त्रासाचा सामना करण्यास त्या सज्ज होतील आणि त्यांच्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. असे केले तरच त्या जगात यशस्वी होतील आणि नाव कमवतील असेही मानुषीने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER