देवीच्या रुपातील ही नायिका आहे हेमा मालिनी

Hema Malini

फोटो पाहून तुम्ही म्हणालच की देवीच्या रुपातील ही हेमा मालिनीच दिसत आहे परंतु ती खूपच तरुण दिसत आहे. त्यामुळे कदाचित हा फोटो मॉर्फ केलेला असेल अशी शंकाही तुमच्या मनात उद्भवली असेल. ही शंका तुमच्याच नव्हे तर अनेकांच्या मनात उद्भवणे साहजिकच आहे. कारण हा फोटो जर जुना असता तर तो कुठे ना कुठे तरी छापला गेला असता. परंतु आजवर हेमा मालिनीचा असा फोटो कधीही पाहिलेला नसल्याने हा फोटो तिचा नसेलच असे तुम्हाला खात्रीने वाटत असेल. पण तुमचा हा अंदाज चुकीचा आहे. हा फोटो खरोखरच हेमा मालिनीचा (Hema Malini) आहे आणि स्वतः हेमा मालिनेच हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेमा मालिनीचा देवीच्या रुपातील हा फोटो हेमा मालिनी जेव्हा 14-15 वर्षांची होती तेव्हाचा आहे. हेमा मालिनीने 1968 मध्ये राज कपूरच्या नायिकेच्या रुपात ‘सपनों के सौदागर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. हा फोटो त्यापूर्वीचा आहे. ही माहिती स्वतः हेमा मालिनीनेच फोटोसोबत दिली आहे. हेमा मालिनीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो टाकला असून त्यासोबत एक कॅप्शनही लिहीली आहे. हेमा मालिनी म्हटले, हा खास फोटो मी गेल्या अनेक वर्षांपासून शोधत होते. एका तामिळ साप्ताहिकासाठी मी विशेष फोटो शूट केले होते. त्या साप्ताहिकाचे नाव मला आता आठवत नाही. परंतु मला चांगले आठवते की, हे फोटो शूट एव्हीएम स्टुडियोत करण्यात आले होते. राज कपूर साहेबांच्या ‘सपनों के सौदागर’ चित्रपटातून प्रवेश करण्यापूर्वीचे हे फोटो शूट आहे. तेव्हा माझे वय 14 किंवा 15 असेल. हा फोटो मला माझ्या ‘बियॉन्ड द ड्रीमगर्ल’ आत्मचरित्रात द्यायचा होता. दुःखाची गोष्ट अशी की खूप शोधूनही तो सापडला नव्हता. मात्र आता अचानक मला हा फोटो सापडल्याने मी खूप आनंदी आहे. माझा हा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER