
तरुण वयात काही तरी आकर्षण लागते. प्रत्येकाच्या जीवनात अशी घटना घडते. पण कधीही कोणीही सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या मुलाखतीत जीवनातील या घटनेबाबत बोलत नाही. मात्र एका बडबोल्या नायकाने मुलाखतीत त्याच्या जीवनातील या घटनेचे वर्णन करीत त्या नायिकेचे नावही सांगितले होते. नंतर मात्र त्याने त्याच्या या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. या गोष्टीनंतर त्या नायकाने आता बडेजावपणा करण्याचे कमी करतो असे म्हटले होते; पण तो ही गोष्ट विसरला असल्याचे दिसत आहे. या नायकाची ही गोष्ट आठवली ती आता करण जोहरच्या चॅट शोमुळे.
करण जोहर त्याच्या शोमध्ये बॉलिवूड (Bollywood) आणि क्रिकेटमधील सिताऱ्यांना बोलावून त्यांच्या मुलाखती घेत असतो. या मुलाखतींमध्ये तो काही वेगळे प्रश्नही विचारतो आणि त्यावर कलाकार आणि क्रिकेटर वादग्रस्त वक्तव्ये देतात आणि त्यामुळे करणच्या शोची चर्चा होते. यात कधी दोन नायिकांचा वाद होईल असे प्रश्न करण विचारतो आणि त्यामुळे वाद झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून करणच्या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांच्या मुलाखतीचा एपिसोड प्रचंड व्हायरल झाला आहे. अर्थात ही मुलाखत जुनी आहे; पण त्यातील या दोघांच्या वक्तव्यामुळे तो चर्चेत होता. त्यानंतर लगेचच करणच्या मुलाखतीत रणवीर सिंहने (Ranveer Singh) केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
करणच्या चॅट शोमध्ये रणवीर सिंह २०१० मध्ये अनुष्का शर्मासोबत आला होता. गप्पांच्या ओघात रणवीर सिंहने म्हटले होते, करीना कपूरला (Kareena Kapoor) स्विमिंग करताना पाहण्यासाठी मी स्विमिंग क्लबमध्ये जात असे. एवढेच बोलून तो थांबला नव्हता तर त्याने पुढे म्हटले होते. स्विमिंग पूलमध्ये करीनाला पाहून मी छोट्या मुलाचा मोठा मुलगा झालो. थोडक्यात त्याच्या बोलण्याचा उद्देश तो प्रौढावस्थेत आल्याचा होता. हा एपिसोड ऑन एअर झाला तेव्हा त्यावर वाद झाला नव्हता. पण आता हार्दिक पंड्या आणि के.एल. राहुलच्या एपिसोडनंतर जेव्हा पुन्हा हा एपिसोड व्हायरल झाला तेव्हा रणवीरवर प्रचंड टीका करण्यात आली.
रणवीरला ही गोष्ट कळताच त्याने म्हटले, मी जेव्हा बॉलिवूडमध्ये आलो तेव्हा मी खूप गर्विष्ठ होतो. मला पटकन यश मिळाल्याने मी हवेत होतो आणि मिळालेले यश पचवण्याची माझी तयारी नव्हती. त्यामुळे मी अशा काही गोष्टी बोलून गेलो होतो ज्या बोलणे टाळले पाहिजे होते. मला आजही त्या गोष्टीचा पश्चात्ताप होतो, असेही रणवीरने सांगितले.
ही बातमी पण वाचा : हा नायक गर्लफ्रेंडचा विश्वास जिंकण्यासाठी लग्नाचे आश्वासन देत असे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला