हिमालयात होताहेत मोठे बदल; एव्हरेस्टच्या उंचीत तब्बल एका मीटरने वाढ

Himalaya

तब्बल पाच कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर महाकाय भूकंप झाला. सारं चित्रच बदललं आणि निर्माण झाला हिमालय. त्याच हिमालयात आहे जगातलं सर्वोच्च शिखर. माउंट एव्हरेस्ट. अनेकदा याची उंची मोजली जायची; पण काही दिवसांपूर्वी चीन आणि नेपाळनं एकत्र उंची मोजण्याचा निर्णय घेतला आणि एक आश्चर्यकारक माहिती समोर आली. या शिखराची उंची  जवळपास एक मीटरनं वाढली.

चीन आणि नेपाळनं एकत्र मोजली उंची

२०१५ ला चीन आणि नेपाळच्या भागात भूकंप झाला. आणि निर्णय घेण्यात आला की माउंट एव्हरेस्टची उंची मोजायला पाहिजे. २०१७ ला या कामाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी धक्कादायक बातमी आली. माउंट एव्हरेस्टची उंची वाढली. एक मीटरनं. या भूकंपामुळं ही उंची वाढल्याचं  बोललं जात होतं. त्यामुळं ही उंची वाढल्याचं समोर आलं.

याआधी अनेकदा एव्हरेस्टची उंची मोजण्याचं काम करण्यात आलंय. पण नेपाळचा कधीच यात सहभाग नव्हता. पण भूकंपानंतर नेपाळने चीनशी हात मिळवत उंची मोजण्याच्या या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. एका लेखी संदेशात नेपाळचे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी म्हणाले होते, “या ऐतिहासिक क्षणी दोन्ही देशांच्या सर्वेक्षण विभागाच्यावतीने संयुक्तिकपणे मापनाच्या प्रकियेला पूर्ण केले आहे. माउंट एव्हरेस्टची उंची ८,८४८.८६मीटर आहे.”

ही उंची आधीच्या उंचीपेक्षा ८६ सेंमी म्हणजेच १ मीटरने जास्त आहे.

आजपर्यंत आपल्याला  माहिती असलेली माउंट एव्हरेस्टची उंची इंग्रजांनी केलेल्या मोजणीतून सांगितली जायची. पण चीन आणि नेपाळने एकत्रित उंची मोजल्यानंतर नवी उंची समोर आली.

कशी मोजण्यात आली उंची

२०१९च्या हिवाळ्यात दोन सर्वेक्षक माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहचले. आणि जगाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचण्याचा त्यांचा अनूभव इतरांपेक्षा वेगळा होता. कारण सामान्यपणे तुम्ही शिखरावर पोहचल्यानंतर तुमची कामगीरी संपते. अंग, खांदे, पाय थकून जातात. पण थकल्यानंतर त्यांना कामाला सुरुवात करायची होती. शिखरा पोहचल्यानंतर त्यांनी दोन तासातच कामाला सुरुवात केली. जीपीएस ट्रेकर सिस्टीमच्या माध्यमातून उंची मोजण्यास सुरुवात झाली.

हे उपकरण नेपाळ आणि चीनसह इतर आठ देशांच्या उपग्रहांशी संपर्कात राहून काम करत होते. उपग्रहांच्या नेटवर्कच्या माध्यमातून जीपीएस ट्रॅकरच्या वास्तविक स्थितीवर मोजणीच्या कामातील त्रुटी टाळण्यात याचा उपयोग झाला. जीपीएसच्या माध्यमातून पृथ्वीचे केंद्रापासून जमिनी लांबी मोजणे, समुद्र पातळीपासून समुद्राची खोली मोजने सोप्प आहे पण एव्हरेस्टच्या बाबतीत हे अवघड काम होतं.

पृथ्वीच्या वैविध्यपूर्ण रचनेमुळं समुद्र सपाटीपासून एकाद्या शिखराचे अंतर मोजण्यात त्रुटी येऊ शकतात. मोजणी चुकू शकते परंतू या वेळी पूर्ण खात्री घेऊन झीरो इररवर काम करण्यात आलंय.  गुरुत्वाकर्षण आणि समुद्र सपाटी दोन्ही गोष्टींचा अभ्यास करुन अत्यंत योग्य डेटा जमा करण्यात आला.

या आधीही मोजण्यात आली होती उंची

चीननं या आधी १९७५ आणि नंतर २००५ला माउंट एव्हरेस्टची उंची  मोजली होती. चीननं तेव्हा एव्हरेस्टची उंची 8.844.43 मीटर असल्याचं सांगितलं होतं. स्नो कॅपचा सामावेश यात चीननं केला नव्हता. यावेळच्या मोजणीत स्नो कॅपचा सामावेश करण्यात आलाय.

पुन्हा मोजावी लागेल उंची

ऑक्सफर्ड विद्यापीठातील अर्थ सायन्स म्हणजे भू विज्ञानाचे प्राध्यापक माईक सअर्ले सांगतात की २०१५च्या  भूकंपावेळी नेपाळमध्यल्या उंचीत एक मीटरचा फरक पडलाय. काठमांडूतील पर्वतांच्या उंचीत एका मीटरची वाढ झालीये. नेपाळी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानूसार स्नो कॅपाच समावेश या उंचीत करण्यात आलाय. स्नो कॅप म्हणजे शिखराच्या टोकावर हिमवृष्टीमुळं साचणारा बर्फाचा स्तर. हवेची दिशा बदलेल तशी ही स्नो कॅपही ढासळते. त्यामुळं पुन्हा एकदा एव्हरेस्टची उंची मोजावी लागेल असं माईक सअर्ले यांच मत आहे.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER