‘विरोधकांबाबत सामनात अग्रलेख आला म्हणजे वर्मी घाव बसला; फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis.jpg

नागपूर :- काल पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) त्यांना टोचणारे आणि बोचणारे मुद्दे आम्ही उचलून धरले. जनहिताचे मुद्दे उचलून धरणे ही आमची सर्वस्वी जबाबदारी आहे, तशीच वृत्तपत्राचीही आहे. आम्ही कोवीड, शेतकरी, गरिबांबाबत सभागृहात बोललो. हे त्यांना दिसले नाही. त्याबद्दल सामनात अग्रलेख आला. त्यामुळे घाव वर्मी बसला आहे, हे आता लक्षात आलं, असा मिस्कील टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी शिवसेनेला(Shivsena) लगावला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरूवातीला ठाकरे सरकारने आम्ही वीज जोडणी कापणार नाही. त्याला स्थगिती दिली आहे, असे सभागृहात सांगितले होते. पण शेवटच्या दिवशी अतिशय थातूरमातूर निवदेन करुन वीज जोडणी कापण्याची घोषणा केली. त्यामुळे आम्ही या सरकारचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणार आहेत. तसेच यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आणि गरीब विरोधी आहे, हे स्पष्ट झालं आहे. राज्य सरकार लबाडी करत आहे. पुढच्या तीन महिन्यात सरकार येईल का नाही? याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार बोलतील, असे म्हणत फडणवीसांनी सूचक संकेत दिले.

या अधिवेशनात महाराष्ट्राच्या जनतेला काहीही मिळालं नाही. सर्वात जास्त विदर्भ आणि मराठवाड्याची निराशा झाली आहे. कोरोना वाढतोय, सरकारचं याकडे लक्ष नाही, सरकारचं नियोजन नाही. अधिवेशनाच्या आधी कोरोना वाढतो, अधिवेशनात कमी होतो आणि अधिवेशनानंतर पुन्हा वाढतो, सरकारला अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना दिसतो. कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यावर सरकारकडून प्रभावी उपाययोजना करण्याचे दिसत नाही. लॅाकडाऊन करणे ही प्रभावी योजना नाही. विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न सभागृहात सादर करणे आणि सरकारच्या चुका लक्षात आणून देणे हे आमचं काम आहे आणि ते काम आम्ही केलं, असेही फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ‘विरोधक जिंकले असे वाटत असेल तर तो गैरसमज’, वाझेंच्या बदलीवरून शिवसेनेचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER