फोटोशूटमध्ये हेअर ड्रेसरचा हात वापरला होता नीतू सिंह यांनी

Neetu SIngh

पूर्वीची नीतू सिंह (Neetu Singh) आणि आत्ताची नीतू कपूर खूप लोकप्रिय अभिनेत्री होती. सुंदरता आणि अभिनयाचा मिलाफ नीतू सिंहमध्ये होता. नीतू सिंह यांनी एकदा एक अत्यंत वेगळा आणि मनोरंजक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला होता. नीतू सिंह लोकप्रिय नायिका असताना स्टार अँड स्टाईल सिने साप्ताहिकाच्या मुखपृष्ठासाठी त्यांना फोटोशूट करायचे होते. प्रख्यात फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा होते. त्यांच्याकडे या मुखपृष्ठासाठी एक कॉन्सेप्ट होते. मलाही ते कॉन्सेप्ट आवडले होते. लाल नखे आणि लाल लिपस्टिकसोबत माझा चेहरा असा तो कॉन्सेप्ट होता. फोटोशूट सुरु झाले. माझ्या नखांना लाल नेलपॉलिश लावले होते. फोटोशूट करताना जाणवत होते की माझे हात चेहऱ्याला सूट होत नव्हते. याचे कारण माझी नखे खूप लहान होती. फोटो चांगला होण्यासाठी काय करावे याचा विचार करीत असताना माझ्या हेयरड्रेसरच्या हातांची नखे लांब असल्याचे दिसले. त्यामुळे आम्ही तिचा हात वापरण्याचे ठरवले. चेहरा माझा आणि हात हेयरड्रेसरचा असा तो फोटो काढण्यात आला आणि तो छापण्यातही आला. फोटो किती विचित्र दिसतोय हे तुम्हाला मुखपृष्ठ पाहून कळेलच असेही नीतू सिंह यांनी पोस्टमध्ये फोटो टाकून सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER