मला धक्के देण्याची सवय; कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच : उदयनराजे भोसले

Udayan Raje Bhosale

सातारा :- भाजपाचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज अचानक साताऱ्यातील पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटरचं उद्घाटन करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला धक्के देण्याची सवय असल्याचं म्हटलं. “कधी कधी मी हे धक्के देतो आणि कधी हे धक्के मलाही बसतात. ” असं ते आपल्या स्टाईलमध्ये म्हणाले.

“मला धक्के देण्याची सवय आहे. कधी दुसऱ्याला बसतो, कधी मला स्वत:ला बसतो. ‘आदत से मजबूर’ म्हणतात तसं आहे. जुन्या सवयी जात नाहीत. मी राजकारण कधी केलं नाही. ते मला जमणारही नाही. मी आजवर समाजकारण केलं. तेही लोकांचं हित नजरेसमोर ठेवून केलं. तेच लक्षात ठेवून माझी पुढील वाटचालही असणार आहे.” असं उदयनराजे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER