उद्योगांची वाढ थांबली, मात्र मोदींच्या दाढीची वाढ होतेय; बॅनर्जींचा निशाणा

Maharashtra Today

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये २७ मार्च रोजी विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांना टोला लगावला. उद्योगांची वाढ थांबली आहे, फक्त मोदींच्या दाढीचीच वाढ होतेय, असे बॅनर्जी म्हणाल्या. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC)नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या.

आज पुन्हा ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “उद्योगांची वाढ थांबली आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींची दाढी वाढत आहे. काहीवेळा ते स्वत:ला स्वामी विवेकानंद म्हणवतात आणि काहीवेळा ते स्टेडिअमचे नाव बदलून आपले नाव ठेवतात. त्यांच्या डोक्यात काही बिघडलंय, त्यांच्या स्क्रू ढिला झालाय वाटतंय.” असे त्या म्हणाल्या. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील व्हिडीओ ट्वीट केला आहे.

दाढी वाढवून कोणी रविंद्रनाथ टागोर होत नाही

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ममता बॅनर्जी यांनी टीका केली, दाढी वाढवून कोणाला रविंद्रनाथ टागोर होता येत नाही. नोटबंदीचा पैसा कुठे गेला? बँकांचा पैसा कुठे गेला? सरकारी मालमत्ता विकायला काढल्या जात आहेत. आता बंगालचा सोनार बांग्ला करण्याच्या बाता मारत आहेत. रविंद्रनाथ टागोर यांची जन्मभूमी जोडासांकू सांगतात. विद्यासागर यांची मूर्ती तोडतात. गुजरातमधील दंगलीचे नायक आहेत.” असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER