सर्वात मोठा दिलासा; आज राज्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट ९३.८८ टक्क्यांवर

Maharashtra Coronavirus Recovery Rate

मुंबई : ठाकरे सरकारने लावलेल्या निर्बंधांमुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत तब्बल ३३ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९३.८८ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण १५ हजार ०७७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत १५ हजार ०७७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत १८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३३ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५३ लाख ९५ हजार ३७० रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.६६ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण २ लाख ५३ हजार ३६७ आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button